Nanded Crime News : व्हॉट्सॲप ग्रुपवर अश्लील मजकूर; तिघांविरोधात गुन्हा दाखल  File Photo
नांदेड

Nanded Crime News : व्हॉट्सॲप ग्रुपवर अश्लील मजकूर; तिघांविरोधात गुन्हा दाखल

राज्य व जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

Obscene text on WhatsApp group; Case registered against three

सारखणी, पुढारी वृत्तसेवा

ग्रामपंचायत संबंधित 'सारखणी समस्या' या व्हॉट्सअॅप ग्रुपवर राज्य व जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांबद्दल अशोभनीय, अपमानास्पद आणि आ क्षेपार्ह मजकूर प्रसारित करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ३० मे घडली असून, ०७ जून रोजी सिंदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आबे. फिर्यादी सूर्यभान सिडाम (सरपंच, रा. सारखणी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी गजानन पवार, हुसैन शेख आणि किशोर चव्हाण यांनी संबंधित ग्रुपवर काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल अत्यंत अशोभनीय भाषा वापरली.

तसेच स्थानिक ग्रामसेवक व इतर अधिकाऱ्यांविरोधात हिंसक भावना निर्माण करणारे आणि समाजात दहशत पसरवणारे मेसेज टाकून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. या मेसेजेसमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणात आरोपी गजानन पवार याला अटक करण्यात आली असून, उर्वरित दोन आरोपी फरार आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक चोपडे (पो.स्टे. किनवट) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी, किनवट (चार्ज माहर) यांच्या आदे-शावरून करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT