

Nanded Mahur Beat does not have any 'LCB' employees
बाबाराव कंधारे
वाई बाजार, पुढारी वृत्तसेवा
पोलीस विभागातील महत्त्वपूर्ण पोलीस शाखा असलेल्या एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखेतील अज्ञात पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रतापाने वाई बाजारसह तालुक्यातील खाजगी 'पंटर 'कडून 'निजामी वसूली' प्रकरणाचा गुंता काही केल्या सुटत नसून वर्षानुवर्षांपासून एलसीबीसाठी वसूली करणारे 'ते' खाजगी वसूली पंटर एलसीबीच्या हाती लागत नसल्याचा आव नांदेडची स्थानिक गुन्हे शाखा आणत असली तरी अगदी पाच दिवसांपूर्वी माहूरातील मटका व्यावसायिकांकडून हप्ता वसूल करणारा 'तो' पंटर नेमका कोण..? हा प्रश्न 'एलसीबी'च्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरत आहे..
नांदेड परिक्षेत्रात रूजू झालेले 'कायदाकठोर' विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांची येथे बदली झाल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कमालीचा अंकुश लागला होता. परंतू अत्यंत संवेदनशील व क्लिष्ट गुन्ह्यांचा शोध घेता घेता संगणकापेक्षाही भारी 'क्लुप्त्या' वापरणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेतील किनवट व माहूर तालुक्यातील माहूरसह सिंदखेड, मांडवी, किनवट ठाण्यांशी संलग्न असलेल्या एलसीबीच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवून चारही पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध धंदे पडद्याआड सुरू ठेवण्यासाठी भेटीगाठी घेवून त्यांचा नियमित हप्ता वसूल करण्यासाठी वाई बाजार येथील दोन व माह तालुक्यातील इतर दोन असे चार खाजगी पंटर हप्तावसूलीसाठी कामी लावल्याचे आता माहूर तालुक्यात जाहीर झाले आहे.
एलसीबीचे ते पोलीस कोण याबाबत 'स्थानिक गुन्हे शाखेच्या वरीष्ठांकडून तगडी कार्यवाही होणे अपेक्षित असताना एलसीबी कडून एलसीबीचे सबंधित कर्मचारी व त्याच्या वसुली पंटरवर कोणत्याही प्रकारच्या कारवाईचा बडगा उगारला गेला नाही. विशेष म्हणजे.. नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले हजरी मेजर बालाजी तेलंग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे माहूर पोलीस ठाण्याशी संलग्न असलेल्या एलसीबीच्या पोलीस कर्मचा-याची बदली झाली असून आजमितीस एलसीबीच्या माहूर पोलीस ठाण्याशी संलग्न जागेवर कुणीही कर्मचारी नाही.
किंबह्ना आज ही जागा रिक्त आहे. असे असताना अगदी पाच दिवसांपूर्वी म्हणजेच ३ व ४ जून २०२५ रोजी माहूर शहरात पडद्यामागे सुरू असलेल्या मटका काऊंटर चालकांकडून वाई बाजारच्या एका खाजगी पंटरने एलसीबीच्या नावाने वसूली केल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर एकाने सांगितले असून आता या खाजगी वसूलीपंटरच्या डोक्यावर नेमका हात कुणाचा..? याचा शोध घेणे एलसीबीसमोर कडवे आव्हान असून पंटरच्या डोक्यावर हात ठेवणाऱ्या एलसीबीच्या त्या अज्ञात पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे हे एलसीबीसाठी 'अवघड जागेचे दुखणे' होवून बसले आहे.