Nanded News : नांदेड पोलिसांची अवैध धंद्यावर मास रेड file photo
नांदेड

Nanded News : नांदेड पोलिसांची अवैध धंद्यावर मास रेड

जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिस दलाने धडक कारवाई करत विशेष 'मास रेड' (Mass Raid) मोहीम राबवली.

पुढारी वृत्तसेवा

Nanded Police conduct massive raids on illegal businesses

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिस दलाने धडक कारवाई करत विशेष 'मास रेड' (Mass Raid) मोहीम राबवली. पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी टाकलेल्या धाडींमध्ये ४९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ८२ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या छाप्यात एकूण २० लाख ५८ हजार १८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील संशयित अड्डे, हातभट्ट्या, अवैध दारू विक्री, मटका, जुगार आणि प्रतिबंधित गुटख्याच्या साठ्यांवर ही अचानक कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र दारूबंदी, जुगार प्रतिबंधक आणि अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दारूबंदी चे ३९ गुन्हे, ४० आरोपींवर कारवाई, १,४५,२८० रुपये जप्त, मटका व. जुगाराचे ०८ गुन्हे, ३९ आरोपी रु. ११,४७,११० रुपये जप्त तसेच गट्खाबाबतचे ०२ गन्हे, ०३ आरोपी ताब्यात, रु. ७,६५,७९२ जप्त अप्पर पोलिस अधीक्षक व सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम फत्ते करण्यात आली.

यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा देत परिसरातील बेकायदेशीर कृत्यांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT