Shri Renuka Mata : श्री रेणुका मातेच्या 'तांबूल' प्रसादाला 'जीआय' मानांकन

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगडावरील श्री रेणुका मातेच्या पवित्र 'तांबूल' (विडा) प्रसादाला आता अधिकृत भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) प्राप्त झाले आहे.
Shri Renuka Mata
Shri Renuka Mata : श्री रेणुका मातेच्या 'तांबूल' प्रसादाला 'जीआय' मानांकनfile photo
Published on
Updated on

Shri Renuka Mata : Shri Renuka Mata's 'Tambul' Prasad is given 'GI' rating

श्रीक्षेत्र माहूर : अपील बेलखोडे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगडावरील श्री रेणुका मातेच्या पवित्र 'तांबूल' (विडा) प्रसादाला आता अधिकृत भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) प्राप्त झाले आहे. या मानांकनामुळे शतकानुशतके चालत आलेल्या या धार्मिक परंपरेला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली असून, माहूरच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे.

Shri Renuka Mata
Nanded News : नांदेडमध्ये साखळीचोरीसह जबरी चोरीच्या नऊ गुन्ह्यांचा पर्दाफाश

केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या चेन्नई येथील 'उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागा'ने देशभरातील विविध पारंपरिक उत्पादनांना भौगोलिक मानांकन दिले आहे. आतापर्यंत देशातील ६२८ उत्पादनांना हा बहुमान मिळाला असून, यात महाराष्ट्रातील ४५ उत्पादनांचा समावेश आहे. आता या मानाच्या यादीत रेणुका मातेच्या तांबूल प्रसादानेही स्थान मिळवले आहे.

श्रीक्षेत्र माहूर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्यानंतर पारंपरिक पद्धतीने तांबूल प्रसाद अर्पण करण्याची परंपरा अनेक शतकांपासून अखंडपणे सुरू आहे. नागवेलीची निवडक पाने, काथ, जायफळ, सुपारी, बडीशेप, लवंग, वेलची, खोबऱ्याचा कीस, काजू, बदाम, केशर आणि इतर पारंपरिक घटकांचे योग्य मिश्रण करून हा प्रसाद तयार केला जातो. विशेष म्हणजे, यासाठी कोणत्याही आधुनिक यंत्राचा वापर होत नाही. मंदिर परिसरातील सात कारागीर दगडी खलबत्त्यात सर्व साहित्य हाताने कुटून हा प्रसाद तयार करतात. यामुळे या प्रसादाची पारंपरिक चव आणि गुणवत्ता कायम राहते.

Shri Renuka Mata
Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून

धार्मिक प्रथेनुसार देवीच्या मुखात एका वेळी सुमारे ५०० नागवेलीच्या पानांचा विडा अर्पण केला जातो व दुसऱ्या दिवशी तो प्रसाद म्हणून भाविकांना वाटला जातो. पचनशक्ती सुधारण्यासाठीही हा प्रसाद गुणकारी मानला जातो. जीआय टॅग मिळाल्यापासून भाविकांमध्ये या प्रसादाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

स्वच्छता व शुद्धतेवर विशेष भर

"तांबूल प्रसादाला जीआय टॅग मिळणे ही केवळ माहूरसाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. प्रसाद तयार करताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जात नाही. स्वच्छता, पारंपरिक पद्धती आणि शुद्धता यावर आमचा विशेष भर असतो. भविष्यातही ही परंपरा जतन करून भाविकांना दर्जेदार प्रसाद उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news