Nanded News : ५० वर्षांच्या मुख्याध्यापकाकडून १० वर्षांच्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन

नांदेडमधील धक्कादायक घटना; नागरिकांतून तीव्र संताप
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

Abuse of 10-year-old student by 50-year-old headmaster

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांत अल्पवयीन बालकांवर अत्याचाराची दुसरी घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. देगलूर येथील दिव्यांग विद्यार्थिनीच्या विनयभंगाची घटना ताजी असतानाच, नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका नामांकित शाळेत १० वर्षीय चिमुकलीसोबत मुख्याध्यापकानेच गैरवर्तन केल्याचा संतापजनक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात संबंधित मुख्याध्यापकावर विनयभंग, पोस्को व अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

Crime News
Nanded crime: अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार; आरोपीस उर्वरित आयुष्य आजन्म कारावासाची शिक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगर परिसरातील प्रतिभा निकेतन शाळेत शिकणाऱ्या १० वर्षीय विद्यार्थिनीसोबत ५० वर्षीय मुख्याध्यापक रवी सोनवणे याने वाईट उद्देशाने गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने घाबरलेल्या चिमुकलीने आरडाओरड केल्याने हा प्रकार समोर आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पालकांनी तातडीने भाग्यनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

शिक्षणाच्या मंदिरातच विद्यार्थिनी असुरक्षित असल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिक व पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शिक्षक व कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासली जाते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Crime News
Nanded Crime | सिंदखेड पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात धडक कारवाई; ७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

मुख्याध्यापकावर अटकेची कारवाई

घटनेची गंभीर दखल घेत भाग्यनगर पोलिसांनी संशयित आरोपी मुख्याध्यापक रवी सोनवणे याच्या विरोधात विनयभंग, भारतीय न्याय संहिता (बीएनएएस) कलम ७४, ७५, ५५१/२, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याचे कलम ८, १०, १२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अॅट्रॉसिटी) कायद्याच्या कलम ३(२) (व्हीए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला औपचारिक अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली.

आहे. पोलिसांनी या प्रकरणी निष्पक्ष व कठोर तपास करून दोषीला कडक शिक्षा करावी, अशी मागणी जोर धरत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाल लैगिंक अत्याचार आणि शोषणाच्या घटनांत कमालीची वाढ झाली असून लहान मुलांपासून ते आबालवृद्धांमध्ये देखील असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या संदर्भातील कायदा अधिक कडक होण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news