Nanded Police Raid : 'ढाब्या'च्या आडून सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांची कारवाई, आसामच्या चार महिलांची सुटका File Photo
नांदेड

Nanded Police Raid : 'ढाब्या'च्या आडून सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांची कारवाई, आसामच्या चार महिलांची सुटका

दोन आरोपी जेरबंद, मुख्य मालक फरार; भाग्यनगर पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Nanded: Police action on Kuntankhana running under the 'Dhabya', four women from Assam were rescued

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : मालेगाव रोड ते खंडोबा चौकाकडे जाणाऱ्या शिव रोडवरील 'विराट ढाबा ऊर्फ कोल्हापुरी तडका ढाबा' येथे छुप्या मार्गाने सुरू असलेल्या कुंटणखान्याचा (वेश्या व्यवसाय) नांदेड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) बुधवारी (दि. १५ जुलै) ही धडक कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली असून, मुख्य मालक पोलिसांना चकवा देऊन फरार झाला आहे. पोलिसांनी या कारवाईत चार पीडित महिलांची सुटका केली आहे.

चौकाकडे जाणाऱ्या शिव रोडवरील 'विराट ढाबा ऊर्फ कोल्हापुरी तडका ढाबा' येथे छुप्या मार्गाने सुरू असलेल्या कुंटणखान्याचा (वेश्या व्यवसाय) नांदेड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) बुधवारी (दि. १५ जुलै) ही धडक कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली असून, मुख्य मालक पोलिसांना चकवा देऊन फरार झाला आहे. पोलिसांनी या कारवाईत चार पीडित महिलांची सुटका केली आहे.

'बोगस गि-हाईक' पाठवून स्चला सापळा शिव रोडवरील 'कोल्हापुरी तडका ढाबा' येथे मालक प्रकाश आवस्ती हा परराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून आणत असे आणि त्यांच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी (नांदेड ग्रामीण) माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.

माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी शासकीय पंचांसमक्ष एका सामाजिक कार्यकर्त्याला 'बोगस गिऱ्हाईक' म्हणून ढाब्यावर पाठवले. तिथे वेश्यागमनासाठी इसम निश्चित करून व्यवहार ठरताच, बोगस गिऱ्हाईकाने पोलिसांना इशारा केला. इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने ढाब्यावर तात्काळ छापा टाकला.

या कारवाईदरम्यान कुंटणखान्यातून नांदेड आणि आसाम येथील एकूण चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. आरोपी या महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने हा व्यवसाय करून घेत होते. घटनास्थळावरून पोलिसांनी वेश्यागमनासाठी वापरण्यात येणारे साहित्य, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण रु. ३२,३२०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गु.र.नं. ३७९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(२) व अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम (ITPA) कलम ३, ४, ५, ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभरोहन यांच्या मार्गदर्शनाखाली, उप विभागीय पोलीस अधिकारी माणिक बेद्रे, पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड, पोलीस अंमलदार रितेश कुलथे, मिलिंद नरबाग, ज्ञानोबा कवठेकर, पोलीस हवालदार मोरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल केंद्रे व पोलीस अंमलदार दासरे, गायकवाड, देवकत्ते यांनी केली. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

मुख्य सूत्रधार फरार

या कारवाईत पोलिसांनी ढाबा चालक तथा व्यवस्थापक रुपेश सुभाष पात्रे (२६ वर्षे, रा. गजानन मंदिर, नांदेड) तसेच वेटर लहू राजू घुगे (२५ वर्षे, रा. नेरली, ता. जि. नांदेड) या दोघांना अटक केली आहे. परंतू ढाब्याचा मुख्य मालक प्रकाश आवस्ती (रा. नांदेड) व चालक हे दोघे फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT