Nanded News : शहरातील मोकळ्या जागा मनपा उपयोगात आणणार का ? pudhari photo
नांदेड

Nanded News : शहरातील मोकळ्या जागा मनपा उपयोगात आणणार का ?

अनेक नगरांत केवळ धार्मिक सण उत्सवासाठीच होतो या जागांचा वापर; काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य

पुढारी वृत्तसेवा

Nanded News: Will the Municipal Corporation utilize the open spaces in the city?

नांदेड, पुढारी वृत्तसेवा शहरात शेत जमीन मालकांनी प्लॉटींग करताना नियमानुसार सोडलेल्या मोकळ्या जागा अनेक वर्षापासून मोकळ्याच आहेत. त्या जागांचा केवळ धार्मिक उत्सवापुरता वापर होत असल्याचे दिसते. अशा जागा रुग्णालये, शाळा यासारख्या सार्वजनिक उपक्रमांसाठी उपयोगात आणल्यास त्या सर्वांसाठी फायदेशीर ठरतील.

या दृष्टीने महानगरपालिकेने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असा पुजारी विशेष सूर विकासप्रेमी नागरिकांतून उमटत आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याची बाब समोर आल्यानंतर अशा जागांचा शोध घेण्याचे सुतोवाच माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या वार्ताहर बैठकीत केले होते. अतिक्रमण नियमित करण्याचा प्रस्तावही शासनाच्या विचाराधीन आहे. परंतु या जागांचा शोध घेणे महापालिकेसाठी एक आव्हान ठरू शकते.

नांदेड मनपात समावेश होण्याआधी तरोडा भागातील शेत जमिनीवर मोठ्या प्रमाणावर प्लॉटींग झाली. आज या परिसरात मोठ्या प्रमाणावर वस्त्यांचा विस्तार झाला आहे. नियमाप्रमाणे सोडण्यात आलेल्या मोकळ्या जागांवर (ओपन स्पेस) अनेक ठिकाणी धार्मिक वास्तू उभारण्यात आल्या आहेत. परंतु काही नगरात अशा जागा अद्यापही मोकळ्याच असल्याचे दिसून येत आहे.

काही ठिकाणी धार्मिकस्थळे असूनही उर्वरित जागांवर अर्धवट बांधकाम करून सोडून दिल्यामुळे या जागांचे चक्क जनावरांच्या गोठ्यात रुपांतर झाल्याचे पहावयास मिळते. तिथे जनावरांसह कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरते. विशेष म्हणजे काही मोकळ्या जागांभोवती खुद महापालिकेनेच लाखो रुपये खर्च करून सुरक्षा मित उभारून दिल्याची माहिती असून तिथे एका लोकप्रतिनिधीने बोअर आणि विद्युत पुरवठाही उपलब्ध करून दिला आहे. परंतु या जागेचा केवळ धार्मिक उत्सव साजरा करण्यापुरता वापर होत असतो.

शहरात शाळांचा विस्तार, दवाखाने, सभागृह, उद्याने, वाचनालये आदी सार्वजनिक उपक्रम राबविण्यासाठी महापालिकेला अशा जागांचा उपयोग कस्ता येणे शक्य आहे. नव्या महापौर आणि उपमहापौरांनी याकडे लक्ष दिल्यास नदिडच्या विकासात मोठी भर पडेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT