

Nanded News: Rohitra burning cases increase
पांगरी, पुढारी वृत्तसेवा : मंठा तालुक्यातील वाई गावात सध्या सिंगल फेजचे रोहित्र जळण्याचे प्रकार वाढले आहे. यामुळे गाव वारंवार अंधारात राहत आहे. महावितरण कंपनीच्या अधिकारी यांनी लक्ष घालून गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
वाई येथील रोहित्रात एका महिन्यात किमान सात ते आठ वेळेस बिघाड होऊन गाव अंधारात रहात असल्याचे चित्र सध्या वाई गावात दिसत आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला असल्याने गर्मी वाढली आहे. परंतु सिंगल फेज डीपी सतत बिघाड झाल्याने पंखा, कुलर, अडगळीत पडलेले आहेत. वाई मधील वार्ड नंबर एक मधील काही भाग सतत अंधारात रहात असल्याचे चित्र दिसत आहे.
वाई येथील सिंगल फेज रोहित्र जळण्याची मालिका सुरू आहे. वारंवार ही समस्या उद्भवत असल्याने सिंगल फेज डीपी ऐवजी गावठाण फीटर बसविण्यात यावे, जेणे करून गावातील वीजपुरवठा वारंवार खंडि होणार नाही. याकडे महावितरण कंपनीने दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा वाई येथील ग्रामस्थांनी दिला आहे.