MLA Rajesh Pawar : उमरीमधील महिला अभियंत्यासह 'बीडीओं'ना तत्काळ निलंबित करा

आ.राजेश पवार यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी
BDO suspension demand
आ.राजेश पवार pudhari photo
Published on
Updated on

नांदेड : उमरी तालुक्यातील पंचायत समितीमध्ये नियुक्त महिला अभियंता भाग्यश्री जाधव यांच्या ऐवजी त्यांचे पती अशोक शेषेराव झडते हे प्रत्यक्ष पूर्णवेळ कामकाज करीत आहेत. याप्रकरणी भाग्यश्री जाधव यांच्यासह त्यांना पाठीशी घालणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आमदार राजेश पवार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

आमदार राजेश पवार यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, पंचायत समिती उमरी येथे अभियंता म्हणून नियुक्त असलेल्या भाग्यश्री जाधव या प्रत्यक्ष कामकाज करीत नाहीत, तर त्यांचे पती अशोक शेषेराव झडते हेच घरकुलाच्या बांधकाम स्थळांवर उपस्थित राहून नोंदणी व तपासणीचे काम करीत आहेत.

BDO suspension demand
Loknath Yashwant : विषमतावादी घटनेची नोंद म्हणजे साहित्य

उमरी येथे नुकत्याच झालेल्या जनता दरबारामध्ये अनेक नागरिकांनी ही गंभीर बाब माझ्या निदर्शनास आणून दिली आहे. या संदर्भात यापूर्वीही मला मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. या जनता दरबारामध्ये दोन लाभार्थ्यांनी असेही स्पष्टपणे सांगितले की, अशोक शेषेराव झडते यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर लाच रक्कम पाठविण्यास सांगितले असून, संबंधित लाभार्थ्यांनी ती रक्कम पाठविल्याचे पुरावेही मला सादर केले आहेत. याबाबत मी तात्काळ गटविकास अधिकारी यांना विचारणा केली असता याबाबत पू-र्वीही तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी कबूल केले.

संबंधित गटविकास अधिकारी व इतर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याची शक्यता असल्याचे राजेश पवार यांनी या निवेदनात नमूद केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अभियंता भाग्यश्री जाधव यांना तसेच गटविकास अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. दोषी अधिकारी-कर्मचारी व संबंधित व्यक्तींवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी. शासनाची फसवणूक, लाभार्थ्यांकडून लाच स्वीकारणे, अधिकाराचा गैरवापर व कट रचणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याने, जिल्हा परिषदेमार्फत संबंधित पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत, आदी मागण्या आमदार राजेश पवार यांनी केल्या आहेत.

BDO suspension demand
12th Board Exam : विद्यार्थिनीचा मोबाईल नंबर मागणाऱ्या पर्यवेक्षकास नातेवाईकांनी बदडले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news