Nanded News : स्मार्ट मीटर पंधरवडा मोहिमेस परिमंडळात प्रतिसाद File Photo
नांदेड

Nanded News : स्मार्ट मीटर पंधरवडा मोहिमेस परिमंडळात प्रतिसाद

ग्राहकांना मिळणार अचूक वीजबिल

पुढारी वृत्तसेवा

Nanded News: Response in the district to the smart meter fortnightly campaign

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: ९ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरस्यान संपूर्ण राज्यात महावितरणतर्फे स्मार्ट मीटर नदिड परिमंडळातही ६१३३ स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. २३ फेब्रुवारीपर्यंत यात अधिकची भर पडणार आहे. जानेवारी २०२६ अखेरपर्यंत परिमंडळात २.०३ लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले होते.

स्मार्ट वीज मीटरची रीडिंग ही मानवी हस्तक्षेपाशिवाय असणार असून ती अॅटोमेटिक मीटर रीडिंग प्रणालीवर आधारित आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वापरानुसारच त्याचे अचूक बिलिंग होते. शिवाय, सौर ऊर्जेचे दर पारंपरिक विजेच्या तुलनेत कमी आहेत. सौर कालावधीतील वीज दर प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपयापर्यंत कमी आहेत.

सध्या सौरऊर्जा उत्पादन वाढत असल्याने सौर कालावधी अर्थात, दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या वीज वापरापोटी ग्राहकांना सवलतीच्या दराने वीजपुरवठा करणे वीज ग्राहकांना मिळणार अचूक वीजबिल (टाईम ऑफ डे) स्मार्ट मीटरच्या माध्यमातूनच शक्य् आहे. अधिकाधिक चांगल्या ग्राहकसेवा देण्यासाठी जुन्या वीज मीटरच्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविणे महावितरणसाठी अत्यावश्यक असल्याने नांदेड परिमंडलासह संपूर्ण राज्यात ९ ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'स्मार्ट मीटर पंधरवडा' साजरा करण्यात येत आहे.

या कालावधीत अधिकाधिक संख्येने ग्राहकांना स्मार्ट मीटर पुरविण्यात येणार आहेत. विजेचे स्मार्ट मीटर हे विनामूल्य् असून त्याचा ग्राहकांवर कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नाही. सौर कालावधीतील वीज वापर नोंदीसाठी सौर मीटरच उपयुक्त असल्याने ग्राहकांची वीजबिलेही कमी होणार आहेत. स्मार्ट मीटरमुळे सरासरी व अंदाजित बिल आकारणीचे प्रमाणही शून्यावर येत आहे. पर्यायाने वीज बिलांच्या तक्रारी संपुष्टात येतील. त्यामुळे ग्राहकांनीही या पंधरवडा मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

नेट मीटर प्रमाणेच घरातील किंवा इमारतीमधील वीज वापर आणि छतावरील सौर प्रकल्पातून निर्माण झालेल्या विजेचे स्मार्ट मीटर मोजमाप करते. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी स्मार्ट मीटर अत्यंत उपयुक्त आहे.

स्मार्ट मीटर पंधरवडा मोहिमेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात ९६६, नांदेड जिल्हयात ४१६२ व परभणी जिल्हयात १००५ ग्राहकांच्या दारावर टीओडी स्मार्ट मीटर बसविण्यात आलेले आहेत. बसविण्यात येणारे मीटर्स हे प्री-पेड नसून जुन्या पध्दतीनुसार वीज वापरानंतर एक महिन्यानंतरच त्याचे बिल भरावयाचे आहे. स्मार्ट मीटर बसविण्यात आलेल्या ग्राहकांना सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत देण्यात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT