Nanded News : शिवरायांच्या जयघोषाने शहर दुमदुमले

शिवप्रेमींचा अभूतपूर्व उत्साह; संपूर्ण परिसर भगवामय
nanded news
Nanded News : शिवरायांच्या जयघोषाने शहर दुमदुमलेfile photo
Published on
Updated on

Nanded shivjayanti celebrating

नांदेड, पुढारी वृत्तसेवा :

ढोलताशांचा गजर, लेझीम पथके, टाळमृदंगाचा निनाद आणि 'जय भवानी... जयशिवाजी'च्या गगनभेदी जयघोषात छत्रपती शिवाजी महार-ाजांची जयंती अत्यंत उत्साह आणि भगवेमय वातावरणात साजरी करण्यात आली. विविध संघटना व संस्थांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून काढलेल्या आकर्षक मिरवणुकांनी जनतेचे लक्ष वेधून घेतले होते.

nanded news
Nanded Accident News : कारच्या धडकेत दोन दुचाकीस्वरांचा मृत्यू

गुरुवारी सकाळपासूनच शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवरायांना वंदन केले.

शिवजयंतीनिमित्त शहरातील चौकाचौकांत उभारलेले भगवे झेंडे, भगव्या पताका आणि शिवसैनिकांच्या गळ्यातील भगव्या दस्त्यांनी वातावरण आल्हाददायक बनले होते. भावसार चौक, तरोडा नाका, वर्कशॉप कॉर्नर, श्रीनगर, शिवाजीनगर, वजिराबादसह जुन्या नांदेड भागात मिरवणुकीतील शिवसैनिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती. असंख्य शिवसैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला.

nanded news
Nanded News | मुखेड-बोधन रस्ते कामाचा ६ वर्षांचा वनवास संपला; जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाकेबाज निर्णयाने काम सुरू

भगव्या दस्त्या व भगवे झेंडे लावून, भगवे फेटे परिधान करून उत्साही शिवसैनिकांनी विविध भागातून रॅली काढून शिवजयंतीचा आनंद द्विगुणित केला. लहान मुलांपासून तरुणाईने या रॅलीत सहभागी होऊन शिवजयंतीचा आनंद घेतला. सकाळपासूनच गल्लोगल्ली विद्यार्थ्यांनीही सायकल रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला.

गेल्या काही दिवसांपासून विविध संघटना, संस्थांनी शिवजयंतीची जय्यत तयारी केली होती. विविध सांस्कृतिक, सामाजिक व रक्तदान शिबिरासारखे आरोग्यदायी उपक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती महोत्सव साजरा केला. दुपारनंतर मुख्य मार्गावरून मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोलताशांचा गजर, लेझीम पथके आणि आकर्षक देखाव्यांनी रथांची केलेली सजावट यामुळे उत्साही वातावरण निर्माण झाले होते. शेकडो शिवसैनिक ढोलताशांच्या ताला-सुरावर बेधुंद झाले होते. काही मिरवणुकीत छत्रपती शिवरायांच्या पराक्रमांचे सुप्रसिद्ध पोवाडे ऐकावयास मिळाले.

मराठा सेवा संघाचा उपक्रम

बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ यांच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवा मोंढा, नांदेड येथे शिवजन्मोत्सव सोहळा पार पडली. या सोहळ्यास माजी मंत्री डी.पी. सावंत, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजीराव कल्याणकर, महापौर सौ. कविता संतोष मुळे, डॉ. साहेबराव कंधारे, माजी आमदार सुभाषराव साबणे, संध्याताई कल्याणकर, कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, शिवराज पाटील होटाळकर, माधवराव देवसरकर, माजी महापौर जयश्रीताई पावडे, माजी उपमहापौर सतीशराव देशमुख, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजीराव पवार, संजय देशमुख लहानकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने डॉ. सुधीर देशमुख यांना मराठा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दिलीप ठाकूर यांना शिवधर्म पुरस्कार

शिवजन्मोत्सवाच्या पावन आणि उत्सवी वातावरणात सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, नांदेड यांच्या वतीने धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांना प्रतिष्ठेचा शिवधर्म सेवा श्री पुरस्कार प्रदान आला. वैद्य करण्यात हॉस्पिटलसमोरील भव्य पेंडॉलमध्ये सकाळी ११ वाजता हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. स्वागतध्यक्ष अनिल धामणे पाटील यांनी दिलीप ठाकूर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news