Nanded News : जीवन घोगरेंच्या अटकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा file photo
नांदेड

Nanded News : जीवन घोगरेंच्या अटकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

काँग्रेसचे नेते जीवन घोगरे पाटील यांच्या वसतिगृहात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आकांक्षा गायकवाड हीने गळफास लावून जीवन संपवले होते.

पुढारी वृत्तसेवा

Nanded News: Protest March on Collector's Office Demanding Jivan Ghogare's Arrest

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: सहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन घोगरे पाटील यांच्या वसतिगृहात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आकांक्षा गायकवाड हीने गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणात घोगरेंवर गुन्हा दाखल झाला. मात्र, तेव्हापासून ते फरार आहेत. त्यामुळे घोगरे यांना अटक करा या मागणीसाठी शिवक्रांती बहुजन संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन घोगरे पाटील यांच्या वसतिगृहात आकांक्षा मुंजाजी गायकवाड या वैद्यकीय शिक्षण घेणा-या तरुणीने आत्महत्या केली होती. आकांक्षाच्या मृत्यू प्रकरणात घोगरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात आणि अॅट्रॉसिटी प्रकरणात घोगरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घोगरे यांना पोलिसांनी अटक केली नव्हती. घोगरे आता फरार झाले असून, घोगरेंना तातडीने अटक करा या मागणीसाठी शिवक्रांती बहुजन संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा वैशालीताई इंगोले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढ्ण्यात आला होता.

या मोर्चात आकांक्षाच्या कुटुंबासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन घोगरेंना तातडीने अटक करा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT