मुखेड : तालुका खरेदी-विक्री संघाच्या १५ संचालक पदांच्या निवडणुकीसाठी मतदारसंघाचे आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखाली शक्तिप्रदर्शन करत भाजपच्या १५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
या निवडणुकीसाठी मुखेड, पाळा, बेटमोगरा, राजुरा (बु.), एकलारा, सावरगाव (पि.), बारहाळी व मुक्रमाबाद या आठ गटांचा समावेश आहे. या सेवा सहकारी संस्थांमधून १५ संचालकांची निवड होणार आहे. त्यामध्ये दोन महिला प्रतिनिधी, दोन वैयक्तिक प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय एक, विमुक्त जाती-भटक्या जमाती एक, अनुसूचित जाती-जमाती एक आणि आठ गटांतून आठ अशा एकूण १५ संचालकांची निवड केली जाणार आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल करताना आमदार डॉ. तुषार राठोड यांच्यासह अॅड. खुशालराव पाटील उमरदरीकर, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, लक्ष्मण पाटील खैरकेकर, व्यंकटराव लोहबंदे, नारायण पाटील सादगीर, सुधीर चव्हाण, किशोरसिंह चौहान, बालाजी पाटील सकनुरकर, चंद्रशेखर देशमुख, अशोक जाजू, मनोज जाजू आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडणुकीत संचालक पदासाठी अॅड. बळवंतराव पाटील बेटमोगरकर, तेजाबाई शिंदे, अनुराधा कदम, लक्ष्मीबाई पाटील, भीमराव दस्तुरे, शिवराज पाटील, चिमणबाई गवते, दिगंबर गोपणर, विजय मस्कले, रमेश पडलवार, व्यंकटराव वाडीकर, आनंदराव शिंदे, बालाजी गवते आणि शिवाजी कुंडगीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.