Nanded Muncipal Corporetion Elelction MP Ashok Chavan Activicts Candidate
विशेष प्रतिनिधी
नांदेड : माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी नांदेड मनपामध्ये बहुमत्तासह जिंकण्याचा निर्धार करणाऱ्या स्थानिक भाजपा नेत्यांनी आता उमेदवार निश्चितीकडे लक्ष केंद्रित केले असून यादीवर खा. अशोक चव्हाण यांच्या समर्थकांचा वरचष्मा राहील, असे दिसत आहे.
खा. चव्हाण यांनी गेल्या दोन दिवसांत उमेदवारविषयक बाबीमध्ये जास्त लक्ष घातले. ज्या प्रभागांत पक्षासाठी अडचणी दिसून आल्या, त्या ठिकाणी वेगळा पर्याय शोधण्यात आला. चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसच्या ज्या माजी नगर सेवकांनी या पक्षात प्रवेश केला, त्यापैकी बहुसंख्य चेहरे भाजपा उमेदवारांच्या बादीमध्ये आहेत, असे सांगण्यात आले.
माजी महापौर जयश्री नीलेश पावडे, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी अलीकडे पाईमाईने भाजपात प्रवेश केला, त्याचवेळी त्यांची उमेदवारी त्यांच्या प्रभागात निश्चित झाली. शैलजा आणि किशोर स्वामी हे दाम्पत्य वेगवेगळ्या प्रभागांत उभे राहणार आहे.
खा. चव्हाण तसेच राजूरकर-डी.पी. सावंत यांचे वास्तव्य असलेल्या शिवाजीनगर प्रभागातील चार जागांसाठी असून ज्यांच्या उमेदवारीत अडचण नाही, अशांना पुढील तयारीस लागण्याची सूचना देण्यात आली आहे.
कोणाची निवड केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तेथे माजी महापौर मोहिनी येवनकर व संदीप सोनकांबळे ही दोन नावे निश्चित आहेत. डॉ. शुभांगी अंकुश देव-सरकर यांचेही नाव चर्चेनंतर मार्गी लागले.
ज्योती कल्याणकर (प्रभाग क्र.१), कविता मुळे (प्रभाग क्र. २), शांभवी प्रवीण साले (प्रभाग क्र.५), वैशाली देशमुख (प्रभाग क्र.६) वा सर्वसाधारण जागांवरील महिलांची नावेही निश्चित समजली जात आहेत. मनपातील अनुभवी माजी नगरसेवक वीरेन्द्रसिभ गाडीचाले यांच्या नावावर कोणीही खळखळ केलेली नाही. शहराच्या दक्षिण भागातील काही प्रभागांमध्ये जुने विरुद्ध नवे यावरून काही ठिकाणी पेच उभा राहिला असल्याचे सांगितले जात आहे.
उपक्रमशील कार्यकर्ते म्हणून ओळ-खले जाणारे दिलीप ठाकूर यांना किंवा त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. जुन्यांपैकी प्रा. नंदू कुलकर्णी, चैतन्यबापू देशमुख, महेश खोमणे यांचा उमेदवारी यादीत समावेश होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खोमणे यांनी दक्षिगेतून उत्तरेकडे धाव घेत, दत्तनगर प्रभागात उमेदवारी मागितली आहे. गाडीपुरा प्रभागातही बरीच चुरस आहे.
भाजपाचे राज्याचे निवडणूक प्रभारी व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. त्यांनी नांदेडमधील खा. अशोक चव्हाण व अन्य संबंधित पदाधिकाऱ्यांना तेथे बोलावून घेतले. संघटनमंत्री संजय कौडगे, नांदेडच्या निवडणुकीचे सहप्रभारी खा. डॉ. अजित गोपछडे, शहराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांचा त्यात समावेश होता. भाजपाचे एबी फॉर्म खा. चव्हाण व राजूरकर यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती येथे मिळाली.
भाजपाच्या बहुसंख्य उमेदवारांबी नावे निश्चित झाल्याचे सांगिलते जात असताना, चव्हाण यांचे निकटवर्ती व पक्षप्रवक्ते संतुका रामराव पांडागळे, आशिष नेरलकर, विनायक सगर आदी इच्छुकांना उमेदवारीसाठी झगडावे लागत असल्याचे दिसून आले. भाजपात असलेले माजी महापौर अजयसिंह बिसेन हेही एक इच्छुक आहेत. त्यांनी व खोमणे यांनी वरिष्ठ पातळीवर धाव घेतली आहे. बिसेन यांनी तर जुन्या कार्यकत्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.