Gambling Raid
Gambling Raid | Pudhari Photo

Nanded Crime | नायगाव पोलिसांची धडक कारवाई ; अंदर–बाहेर जुगार अड्ड्यावर छापा; १२ जणांना अटक

६ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, अवैध जुगार अड्ड्यांना मोठा दणका
Published on

Gambling Raid Nanded

नायगाव : नायगाव तालुक्यातील तलबीड शिवारात सुरू असलेल्या अवैध अंदर–बाहेर जुगार अड्ड्यावर नायगाव पोलिसांनी अचानक छापा टाकत १२ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन व मोटारसायकली असा एकूण ६ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही धाड २५ डिसेंबर रोजी सायंकाळी टाकण्यात आली असून २६ डिसेंबर रोजी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रानसुगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर व्यंकटराव जाधव यांच्या तलबीडजवळील शेतात मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांना मिळाली होती. माहितीची खात्री झाल्यानंतर नायगाव पोलिसांनी तातडीने पथक तयार करून दोन पंचांच्या उपस्थितीत नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला.

Gambling Raid
Nanded car accident: सुसाट कार डिव्हायडरवर आदळून भीषण अपघात; आगीत होरपळून चालकाचा जागीच मृत्यू

छाप्यादरम्यान अविनाश प्रकाश माचनवाड (रा. हंगरगा, ता. उमरी), शंकर गणपती देवडे (इतवारा, नांदेड), हनुमंत गंगाधर वानखेडे (सावरखेड), नागोराव आनंदा गायकवाड (सावरखेड), संजय शंकर बाणेवाड (घुंगराळा), गणेश बालाजी पवळे (कोपरा, ता. नायगाव), शेख खादीर दस्तगीर (घुंगराळा), गणपती गोविंदराव जाधव (सुगाव), भगवान गणपती ढगे (सावरखेड), माधव कोंडीबा सुगावे (घुंगराळा), साईनाथ बाबू गायकवाड (सावरखेड) आणि माणिका बळी वानखेडे (सावरखेड) हे १२ जण जुगार खेळताना आढळून आले.

पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १ लाख ८ हजार ८०० रुपये रोख, ९ मोबाईल फोन आणि ५ मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस कर्मचारी बालाजी बळवंतराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Gambling Raid
Nanded News | माळेगाव यात्रेत शंकरपट स्पर्धेचा थरार; ३८ बैलजोड्यांचा सहभाग

या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर, पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड, सुरज तिडके, पो.हे.कॉ. मुद्देमवार, भगवान कोतापल्ले, सुदाम जाकोरे, पो.कॉ. गजानन चापलकर, विनोद भंडारे, गाजुलवार, अंभोरे, ममताबादे व बालाजी शिंदे यांनी सहभाग घेतला. या धडक कारवाईमुळे नायगाव तालुक्यातील अवैध जुगार अड्ड्यांना मोठा दणका बसला असून पोलिसांच्या कारवाईने जुगार चालकांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news