MSRTC  (Pudhari Photo)
नांदेड

Nanded news: मुखेडकरांचा प्रवास सुखकर होणार; प्रवासी संघटनेच्या पाठपुराव्यानंतर आगाराला आठ नवीन बसेसची भेट

उर्वरित मागण्याही टप्प्याटप्प्याने सोडवण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे

पुढारी वृत्तसेवा

मुखेड : मुखेड ते नांदेड बस सेवा विस्कळीत असणे आणि शिरूर ताजबंद ते मुखेड दरम्यान सायंकाळच्या वेळी बसची सोय नसणे, यांसारख्या समस्यांमुळे होणारी प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता, स्थानिक प्रवासी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला होता. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संजय येलमवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विभागीय नियंत्रकांची भेट घेऊन या समस्यांबाबत निवेदन दिले होते. या पाठपुराव्याला आता दुहेरी यश मिळाले असून, मुखेड आगाराला तीन वातानुकूलित ई-बस आणि पाच राजमाता जिजाऊ बसेस मिळाल्या आहेत.

दिलेले आश्वासन पूर्ण

विभागीय नियंत्रकांनी यापूर्वी मुखेड-नांदेड-परभणी मार्गावर ई-बस सुरू करण्याचे आणि राजमाता जिजाऊ बसेस उपलब्ध होताच त्यापैकी सात बसेस मुखेडला देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, प्रशासनाने तीन ई-बस या मार्गावर सुरू केल्या आहेत, तर नुकत्याच पाच जिजाऊ बसेस मुखेड आगाराकडे सुपूर्द करून आपले आश्वासन पूर्ण केले आहे. उर्वरित मागण्याही टप्प्याटप्प्याने सोडवण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण

या यशामुळे परिसरातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. या शिष्टमंडळात रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप कोडगीरे, सचिव ज्ञानेश्वर डोईजड, पत्रकार अविनाश देशमुख, संजय मुक्कावार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रवासी संघटनेच्या प्रलंबित मागण्या:

  • मुखेड ते मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांची बससेवेद्वारे थेट जोडणी करावी.

  • बसस्थानकावरील चार्जिंग स्टेशनचे काम तातडीने पूर्ण करावे.

  • बसस्थानकावर प्रवाशांसाठी निवारा आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी.

  • मुखेड-कौठा-नांदेड बस सेवा सुरू करावी.

  • मुखेड-कोलंबी-नांदेड बसच्या फेऱ्या वाढवाव्यात.

  • मुखेड-नांदेड टपाल बसची सेवा जाम (ता. मुखेड) पर्यंत विस्तारित करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT