राज्यपाल बागडेंसोबत सेनेच्या दोन आमदारांना मानाचे स्थान File Photo
नांदेड

Nanded News : राज्यपाल बागडेंसोबत सेनेच्या दोन आमदारांना मानाचे स्थान

कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांच्या मानकऱ्यांची घोषणा : १४ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

पुढारी वृत्तसेवा

Nanded Kusumtai Chavan Memorial Award

नांदेड : पुढारी वृत्तसेवा: काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या येत्या १४ जुलैच्या जयंतीदिनी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्काराच्या मानकऱ्यांचा गौरव केला जाणार असून ह्या कार्यक्रमात शिवसेनेच्या दोन स्थानिक आमदारांना व्यासपीठावर मानाचे स्थान देण्यात येणार आहे.

भाजपा खासदार अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित कंपनीतर्फे चालविण्यात येणाऱ्या दैनिकातर्फे वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त डॉ. वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणान्यास कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार दिले जातात, यंदाच्या मानकऱ्यांची नावे संयोजकांनी रविवारी जाहीर केली.

पण प्रशासकीय योगदानाबद्दल नांदेडचे माजी आणि आता नागपूरला जिल्हाधिकारी असलेले डॉ. बिपीन इटनकर यांच्यासह प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे 'वहाट' समर्थपणे सादर करणारे कलाकार संदीप पाठक, नांदेडचे डॉ. नितीन जोशी, पत्रकार राहुल कुलकर्णी यांचा सन्मान केला जाणार आहे, खा. चव्हाण यांच्या आमदारकन्या श्रीश्या तसेच शिवसेनेचे बालाजी कल्याणकर आणि आनंदा बोंढारकर यांना व्यासपीठीय डॉ. नितीन जोशी स्थान मिळाले आहे. इतर सर्च आमदारांना निमंत्रित करण्यात येणार असरने, तरी पत्रिकेतील पाहुण्यांत त्यांना स्थान नाही, असे कळते. या कार्यक्रमास राज्यपाल बागडे है मुख्य पाहुणे असल्यामुळे व्यासपीठावरील गर्दी टाळण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.

शंकररावांच्या हयातीत १४ जुलै रोजी त्यांच्या कादिवसानिमित्त स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्ष च अन्य संस्थांतर्फे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात. त्यांच्या निधनानंतर ही परंपरा कायम राहिली, शंकररावांचा परिवार आणि मोठा गोतावळा आता भाजपावासी झाला असून यंदाच्या मुख्य कार्यक्रमावर भाजपाचा प्रभाव दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे कोणते कार्यक्रम होणार आहेत, ते अद्याप स्पाट झालेले नाही.

अशोक चव्हाण यांनी फार पूर्वी एका कार्यक्रमासाठी भाजपा नेते नितीन गडकरी यांना आमंत्रित केले होते. आता भाजपाच्याच मुशीतील, पण पक्षीय राजकारणाबाहेर गेलेले आणीबाणीतील बंदी हरिभाऊ बागडे चव्हानांच्या निमंत्रणावरून येत असून ते शंकररावांवर काय बोलणार याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.

सावंत यांना 'जीवनगौरव'

बाल वाङ्मयासाठीचा यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त करणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्याचे संयोजकांनी ठरवले आहे. डॉ. सावंत आणि इतर मानकऱ्यांच्या नावांची अधिकृत घोषणा रविवारी करण्यात आली.

चव्हाणांचे पहिले पाऊल !

येत्या १४ जुलै रोजी कुसुम सभागृहात होणारा कार्यक्रम राजकीय किंवा पक्षीय नसला, तरी नांदेड मनपाच्या आगामी निवडणुकीत शिवसेना-शिंदे गटाशी जळवून घेण्याच्या दृष्टीने खा. अशोक चव्हाण यांनी पहिले पाऊल टाकले असल्याचे एकंदर नियोजनावरून दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT