Nanded News : नितीन गडकरी यांच्या भेटीचा 'जागर' सुरू !

'नांएसो'च्या पीपल्स कॉलेजच्या अमृतमहोत्सवाचे निमंत्रण
Nanded News
Nanded News : नितीन गडकरी यांच्या भेटीचा 'जागर' सुरू !File Photo
Published on
Updated on

Invitation Amrit Mahotsav People's College Nitin Gadkari

विशेष प्रतिनिधी

नांदेड : मागील २० वर्षांचा 'मागोवा' घेता, बेकायदेशीर कारभारी अशी ज्यांची 'ओळख' आहे. अशा संस्था पदाधिकाऱ्यांच्या वतीने एक शिष्टमंडळ भाजपा नेते-केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीस गेले आणि त्यांना 'नांएसो'च्या कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन आले. या भेटीचा 'जागर' आता केला जात आहे.

Nanded News
Nanded News : घरकुल लाभार्थ्यांना मिळणार दिलासा, हप्ते लवकरच होणार खात्यामध्ये जमा

नांएसो आणि या संस्थेतर्फे चालविण्यात येणारी दोन महाविद्यालये मागील आठवड्यात चांगल्या नव्हे तर वाईट कारणांमुळे गाजली. यांतील 'पीपल्स' महाविद्यालयाचे अमृतमहोत्सवी वर्ष सध्या सुरू असून त्यानिमित्त नियोजित कार्यक्रमाचे निमंत्रण गडकरी यांना देतानाच या शिष्टमंडळाने त्यांना नरहर कुरुंदकर यांचे 'जागर' आणि इतर भरमसाठ पुस्तके सप्रेम भेट दिली.

धर्मनिरपेक्ष डाव्या विचार सरणीतील कृतिशील मंडळींनी 'नांएसो' संस्था आणि पीपल्स कॉलेज नावारुपास आणले. स्वामी रामानंद तीर्थ, भगवानराव गांजवे, गोविंदभाई श्रॉफ, स.दि. महाजन, म.द.पाध्ये यांच्यानंतर ज्या मंडळींच्या ताब्यात संस्थेची सूत्रे आली आहेत, त्यांतील डॉ. व्यंकटेश काब्दे वगळता कोणाचेही सभासदत्व वैध नाही. अशा बेकायदेशीर कार्यकारिणीतर्फे गडकरी यांना निमंत्रण देण्यात येताच, दुसऱ्या एका गटाने गडकरी यांना संस्थेतील खरी स्थिती कळविण्याची तयारी चालविली आहे.

Nanded News
Nanded Crime : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करून चाकू दाखवत जीवे मारण्याची धमकी

एक मोठी नामांकित संस्था, गौरवशाली परंपरा सांगणारे पीपल्स कॉलेज; पण आपणच कारभारी असल्याचे सांगणाऱ्या पदाधिकाऱ्यांतील एकही जण गडकरींकडे गेला नाही. नागपूरला गेलेल्यांची छायाचित्रे समाजमाध्यमांत पसरवली जात आहेत. त्यांच्यामध्ये प्राचार्य लक्ष्मण शिंदे, बालाजी कोंपलवार, नौनीहालसिंघ जहागिरदार, दीपनाथ पत्की इत्यादींचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news