Married Woman Harassment for Dowry Kinwat Police
किनवट : पतीला नोकरी लावण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ करून मारहाण केली. या प्रकरणी मंजुषा गेडाम (वय ३१, रा. जिजामाता कॉलनी, मांडवा रोड, किनवट) यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पतीसह चौघांविरोधात किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी मंजुषा गेडाम यांनी महिला सहाय्यक कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे तक्रार दिल्यानंतर त्या ८ जून रोजी किनवट पोलीस ठाण्यात हजर झाल्या. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, दि. १ ऑगस्ट २०१५ पासून ते १४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पती किशन नागोराव गेडाम, सासरे नागोराव गेडाम, सासू शकुंतला गेडाम आणि नणंद अनुसया नागोराव गेडाम यांनी संगनमत करून सतत छळ केला. पाच लाख रुपये माहेरून आणावेत, म्हणून शिवीगाळ, मारहाण व जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आणि अखेर तिला घराबाहेर काढण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तुकाराम वाडगुरे करत असून, कार्यवाही प्रभारी पोलीस निरीक्षक चोपडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.