नवीन नांदेड : जिल्ह्यातील सोनखेड शहरातील मोरगे पेट्रोल पंपावर १० जून रोजी दुपारच्या सुमारास किरकोळ कारणावरून एका युवकाचा खून झाला होता. याप्रकरणी दोघांवर सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने सदरील दोन आरोपींना गुरुवार दि. ११ रोजी दुपारी २ वाजता नांदेड शहरातील बसस्थानकात सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
या घटनेबद्दल आधीक माहिती अशी की, दिनांक 10 जून रोजी पोलीस स्टेशन सोनखेड हद्दीत मोरगे पेट्रोल पंपावर दोन इसमांनी मृत युवक किफायत अली खाजा मोईनोद्दीन याला पेट्रोल पंपावर पेट्रोल आहे का? असे विचारले असता किफायत अली यांनी मी प्लंबर आहे, तुम्ही पेट्रोल पंपावर विचारपुस करा असे सांगितले असता त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यावरून यातील आरोपींनी किफायत अली व साक्षीदार यांना काठीने, लाथा बुक्क्याने मारहाण करून किफायत आली यांचा खून केला व घटनास्थळावरून पळून गेले.
याबाबत सोनखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील फरार आरोपींचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्था. गु.शा. चे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना केली होती. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक भोसले यांनी वेगवेगळे पथके तयार करण्यात आली होती. सोनखेड खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपी हे मध्यवर्ती बसस्थानक, नांदेड येथे आहेत. त्यावरून मिळालेल्या माहितीचे ठिकाणी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सापळा लावुन आरोपी पवन राजेभाऊ चौधरी वय 23 वर्ष, रा. गणपती मंदीराजवळ सोनखेड, बालाजी शिवाजीराव मोरे वय 36 वर्ष, रा. बालाजी मंदीराजवळ दगडगाव रोड यांना अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली अतुल भोसले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड. भागवत नागरगोजे सहा पोलीस निरीक्षक, पो.स्टे. सोनखेड, विठ्ठल घोगरे सहा. पोलीस निरीक्षक, स्था. गु.शा. नांदेड, महेश कोरे, पोलीस उप निरीक्षक स्था.गु.शा. नांदेड. साईनाथ पुयड, पोलीस उप निरीक्षक, स्था. गु.शा. नांदेड. नागनाथ तुकडे, पोलीस उप निरीक्षक, स्था. ग.शा. नांदेड. वैशाली कांबळे मपोउपनि पो.स्टे. सोनखेड, स्था.गु.शा. नांदेड येथील सपोउपनि दारासिंग राठोड, पोहेको मोहन हाक्के, सुनिल गटलेवार, मिलींद नरबाग, ज्ञानोबा कवठेकर, पोको/ प्रमोद जोंधळे, बालाजी कदाम, संदीप घोगरे, इम्रान शेख, माधव माने, श्रीराम दासरे, मनोज राठोड, लहु चाटे, आबासाहेब पिंगलवाड, विश्वनाथ पवार, धम्मानंद जाधव, चापोकों/सुधाकर देवकत्ते, अमोल घेवारे, मारोती मुंडे, पोकों/राजीव बोधगोरे, गोविंद राठोड, साहेबराव कदम, गणेश यादव, सायबर सेल येथील पोहेका राजु सिटीकर, दिपक ओढणे, पोकों/महेश बडगु, सपोउपनि ज्ञानेश्वर तिडके स्ट्रीट सेफ्टी पथक नांदेड यांनी केली.