Nanded Crime : धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा खून; 24 तासांत 5 आरोपी जेरबंद

एलसीबीची कारवाई; झुडपात लपून बसलेल्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या
Nanded Crime News
तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.pudhari photo
Published on
Updated on

नांदेड ः नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (दि.4) रात्री पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने एका तरुणाच्या छातीवर, पोटावर सपासप वार करून खून केला. या खुनाच्या गुन्ह्यातील पाच फरार आरोपींना 24 तासांत अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाला यश आले आहे. अर्जुन तातेराव हंबर्डे (31, रा. विष्णुपूरी नांदेड) असे मयत तरुणाचे नाव आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, अर्जुन हंबडे हा गुरुवारी रात्री परिसरातील एका मंदिरात आरतीसाठी गेला होता. आरती झाल्यनंतर घरी परत येत असताना अर्जुनला रात्री साडे वाजेच्या सुमारास रस्त्यात आडवून या पाच जणांच्या टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यातच अर्जुनचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. दरम्यान शहरातील वाढत्या खूनाच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.

Nanded Crime News
Nanded Crime : नांदेडमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा केल्यापासून हे सर्व आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाले होते. या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करण्यात आली होती.

खबऱ्याची माहिती अन्‌‍ पोलिसांनी आवळला पाश

जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी गुन्हेगारांवर सुरू केलेल्या ‌‘ऑपरेशन फ्लश आऊट‌’ अंतर्गत एलसीबीचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले आणि पोलिस उपनिरीक्षक महेश कोरे यांचे पथक जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शुक्रवारी (दि. 5 जून) पेट्रोलिंगवर होते.

याच दरम्यान, खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी हे बिलोली ते कुंडलवाडी जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला झुडपांत लपून बसले असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता बिलोली परिसराकडे धाव घेतली. पोलिसांनी अत्यंत सतर्कतेने संशयित जागेला वेढा घातला.

पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दबा धरून लपून बसलेल्या प्रविण एकनाथ हंबर्डे (23), चैतन्य संजय पांचाळ (18), विनायक ऊर्फ सुरज बळीराम तागडे (19), अरीफ खमर पाशा शेख (18), प्रथमेश तुकाराम कडेकर (19, सर्व रा. विष्णुपुरी, ता. जि. नांदेड) या पाचही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची सखोल विचारपूस केली असता, त्यांनी खुनाचा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Nanded Crime News
Nanded Crime : खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नांदेड एलसीबीने ठोकल्या बेड्या!

यांनी बजावली कामगिरी

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि विठ्ठल घोगरे, पोउपनि महेश कोरे, पोउपनि साईनाथ पुयड, पोउपनि मिलिंद सोनकांबळे आणि सायबर सेलचे पोकॉ महेश बडगु, सिटीकर व ओढणे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news