Nanded Crime News : वाळूमाफियांकडून ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त; नांदेड पोलिसांची कारवाई file photo
नांदेड

Nanded Crime News : वाळूमाफियांकडून ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त; नांदेड पोलिसांची कारवाई

नांदेडचे पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे.

पुढारी वृत्तसेवा

Nanded Crime News : 76 lakh worth of goods seized from sand mafia; Nanded police action

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेडचे पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत माळाकोळी आणि नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकांनी अवैध रेती उपसा आणि वाहतुकीवर धडक कारवाई करत ₹७६.२५ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण ७ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

पहिल्या कारवाईत २४ जुलै रोजी बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, माळाकोळी बायपास रोडवरील करीलीफ हॉटेलजवळ पोलिसांनी सापळा रचून हायवा टिपर (MH 26 BE 8080) अडवला. चालक गजानन मुरली कदम (रा. सेलगाव, ता. लोहा) याच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी ०५ ब्रास रेती (₹२५,०००) आणि हायवा टिपर (₹२० लाख) असा एकूण २०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र महसूल अधिनियमांतर्गत माळाकोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या कारवाईत नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने नागापूर येथील गोदावरी नदीपात्रात धाड टाकून यांत्रिक साधनांनी अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली. घटनास्थळावरून १० ब्रास रेती (५०,०००), ३ मोठ्या लोखंडी बोटी (४५.४५ लाख) आणि १ लहान बोट (₹१०.०५ लाख) व रेती उपशाचे साहित्य असा एकूण ₹५६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गजानन मस्के, बालाजी सपुरे, सचिन सपुरे (सर्व रा. नागापूर) व इतर ३ फरार आरोपींविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नांदेड जिल्हा पोलीस अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू ठेवणार असून, नागरिकांनी बेकायदेशीर कृत्यांची माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT