व्हायरल व्हिडिओचा पोलिसांना फायदा; आंतरजिल्हा टोळी जेरबंद  pudhari photo
नांदेड

Nanded Crime : व्हायरल व्हिडिओचा पोलिसांना फायदा; आंतरजिल्हा टोळी जेरबंद

घरफोडीचे दहा गुन्हे उघड; 78 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः नांदेड शहरात धुमाकूळ घालणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात भाग्यनगर गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे.एका चोरीचा सिसीटीव्ही (फुटेज) व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि पोलिसांनी याच व्हिडिओच्या आधारे एका अल्पवयीन मुलांसह पाच जणांना ताब्यात घेत 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून, त्यांच्याकडून 44.5 तोळे सोने, 171.4 तोळे चांदी, एक कार आणि तीन मोटारसायकल असा एकूण 78 लाख 35 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी फरांदे नगर भागात चोरी करून पळत असलेल्या तीन चोरट्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड करण्याचे आदेश दिल्यानंतर, भाग्यनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सीसीटीव्ही फुटेज, डम्प डेटा आणि सीडीआर यांसारख्या तांत्रिक पद्धतींचा वापर करून पोलिसांनी आरोपींचा माग काढला.

पोलीस पथकाने बाबानगर भागात सापळा रचून सोहेल अब्दुल सत्तार, प्रदीपकुमार कौरी आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी भाग्यनगर, शिवाजीनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.

तसेच चोरीचा माल अर्जुन मोरे, शेख नईम आणि आशा तेलंग यांना विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या सर्वांकडून चोरीचा माल जप्त केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख करत आहेत. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

तपास पथकाची कामगिरी

भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, महेश माळी, पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख, नरेश वाडेवाले, विशाल माळवे, केळगंद्रे, विष्णूकांत मुंडे, सुधाकर मलदोडे, राहुल लाठकर, नागनाथ चापके, राजीव घुले, अदनान पठाण, अंकुश कांबळे तसेच सायबर सेलचे मारोती चव्हाण, राजेंद्र सिटीकर, दीपक ओढणे, सीमा पठाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

  • सोने: 44.5 तोळे (किंमत 68,80,850 रुपये)

  • चांदी: 171.4 तोळे (किंमत 4,54,210 रुपये)

  • वाहने: 1 मारुती कार, 3 मोटारसायकल व इतर (किंमत 5 लाख रुपये)

  • एकूण किंमत: 78,35,060 रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT