नांदेडमध्ये दुचाकी चोरीप्रकरणी दोन अल्पवयीन मुले ताब्यात pudhari photo
नांदेड

Nanded bike theft case : नांदेडमध्ये दुचाकी चोरीप्रकरणी दोन अल्पवयीन मुले ताब्यात

पोलिसांची कारवाई ः चार लाख रुपये किमतीच्या 17 दुचाकी जप्त

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करत असताना वजिराबाद पोलिसांच्या हाती एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या गुन्ह्यांचा पोलिस शोध घेत होते, ते गुन्हे कोणा सराईत गुन्हेगाराने नव्हे, तर काही अल्पवयीन मुलांनी केल्याचे उघड झाले आहे. कारवाईत पोलिसांनी चार लाख रुपये किमतीचे तब्बल 17 दुचाकी जप्त केल्या असून, कोवळ्या वयातील मुलांचा गुन्हेगारीतील सहभाग विचार करायला लावणारा आहे.

काही दिवसांपूर्वी चिखलवाडी कॉर्नर येथून मोहम्मद जुनेद कुरेशी यांची पल्सर चोरीला गेली होती. या तक्रारीवरून वजिराबाद पोलिसांनी तपास सुरू केला असता हिंगोली गेट परिसरात दोन मुले संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून या मुलांना ताब्यात घेतले.

तपासादरम्यान जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा पोलिसही अवाक् झाले. ही मुले अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तात्काळ त्यांच्या पालकांना पाचारण केले. पालकांच्या उपस्थितीत झालेल्या चौकशीत या मुलांनी एकामागून एक तब्बल 17 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. यामध्ये ?वजिराबाद पोलिस ठाण्यात 3 गुन्हे उघड व नांदेड ग््राामीण एक गुन्हा उघड झाला. यात एकूण जप्त चार लाख रुपये किमतीच्या 17 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

या प्रकरणाचा अधिक तपास पोहेकॉ विजयकुमार नंदे करत असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र या कारवाईने गुन्हेगारीच्या विळख्यात अडकणाऱ्या अल्पवयीन मुलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT