Purna theft case : पूर्णेत जबरी चोरीतील ५ जण जेरबंद, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

६ दुचाकी आणि ११ मोबाईलचा समावेश
Purna theft case
दोन जबरी चोऱ्यातील जेरबंद केलेल्या ५ आरोपी समवेत पूर्णा ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी.pudhari photo
Published on
Updated on

पूर्णा : शहरात काही दिवसांत घडलेल्या दोन जबरी चोरीच्या घटनांचा छडा लावत पूर्णा पोलिसांनी धाडसी कारवाई करत ५ सराईत चोरट्यांना जेरबंद केले. आरोपींकडून तब्बल ८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ६ दुचाकी आणि ११ मोबाईलचा समावेश आहे.

१३ ते १६ मार्च दरम्यान शहरात दोन गंभीर चोरीच्या घटना घडल्या. पहिल्या घटनेत माटेगाव येथील आत्माराम बोबडे यांचा मोबाईल अज्ञातांनी हिसकावून नेला. तर दुसऱ्या घटनेत अलंकार नगरातील मनोहर सोपान माघाडे यांना दुचाकीवरून अडवून खाली पाडत मारहाण केली. यावेळी आर-ोपींनी त्यांच्याकडील रोख रक्कम, कागदपत्रे व दुचाकी लंपास केली होती. दोन्ही प्रकरणी पूर्णा ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

Purna theft case
Dudhna river illegal sand mining : दुधना नदीत अवैध रेती उत्खनन; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

याची गांभीर्यान दखल घेत पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आध ारे अवघ्या तीन दिवसांत आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. नंतर सापळा रचून आरोपींना शिताफीने अटक केली. कारवाईत आयुष राजेंद्र बरकुंटे, अंकित संजय गायकवाड, श्रीनिवास गाडगे यांच्यासह अन्य दोन आरोपींना अटक करण्यात आली.

न्यायालयात हजर केल्यानंतर सर्व आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कारवाई दरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेल्या ६ दुचाकी आणि ११ मोबाईल असा ८ लाख ५० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरील धाडसी कारवाई डीवायएसपी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, सहायक पोलिस निरीक्षक गजानन पाटील, पथकातील श्रीनिवास पडलवार, प्रकाश इंगोले, शेख ताजोद्दीन, सुरेश राठोड, रमाकांत तोटेवाड, अजय माळकर, सुरेश चव्हाण, सुधीर काळे, माधव अकलवाड आदींनी केली.

Purna theft case
Nanded News : पावसाच्या धास्तीने शेतकरी चिंतेत

शहरात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रात्री गस्त वाढविण्यात आली असून सिव्हिल ड्रेसमधील कर्मचारीही तैनात करण्यात आले. तसेच रेल्वे स्थानक परिसर आणि स्थानिक पोलिसांकडून संयुक्त गोपनीय तपास सुरू आहे. नागरिकांनीही सतर्क राहून दुचाकी पार्क करताना हँडल लॉक करणे, मोबाईल व मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news