नांदेड

नांदेड : धर्माबाद- कंदकुर्ती मार्गावर अपघात; दुचाकीस्वार ठार, एक जखमी

अविनाश सुतार

धर्माबाद; पुढारी वृत्तसेवा: धर्माबाद- कंदकुर्ती महामार्गावर रोहित बारच्या समोर बोलोरो पिकअप् गाडीची धडक लागून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर एकजण जखमी झाला. ही घटना आज (दि. ११) दुपारी घडली.

विनोद माधवराव मिनके (वय ३३, रा. रावधानोरा, ता. उमरी) असे मृताचे नाव आहे. तर दतात्रेय भुमा कंठे (वय २२, रा. बेलूर (बु), ता. धर्माबाद) असे जखमीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धर्माबाद – कंदकुर्ती महामार्गावर (एम एच २६ बी पी५३०८) या दुचाकीला (एमएच २२ए एन १७९८) पिकअप वाहनाने जोराची धडक दिली. यात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. एकजण जखमी झाला. त्याला रुग्णालयात हालविण्यात आले. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT