भारत-अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी खा. अशोकराव चव्हाण Pudhari File Photo
नांदेड

भारत-अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी खा. अशोकराव चव्हाण

कसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली आहे. या नियुक्तीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे संसदीय संबंध दृढ करण्याच्या प्रक्रियेत चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

MP Ashokrao Chavan appointed as the Chairman of India-Argentina Parliamentary Friendship Group

नांदेड, पुढारी वृत्तसेवा :

राजकारणातील प्रदीर्घ अनुभव असलेले राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारत-अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली आहे. या नियुक्तीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे संसदीय संबंध दृढ करण्याच्या प्रक्रियेत चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

द्विपक्षीय सहकार्याला मिळणार गती

भारत आणि अर्जेंटिना या दोन देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक वृद्धिंगत करणे, हा या गटाचा मुख्य उद्देश आहे. संसदीय पातळीवर दोन्ही देशांतील लोकप्रतिनिधींमध्ये सुसंवाद साधणे, विचारांची देवाणघेवाण करणे आणि व्यापार, तंत्रज्ञान तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधी शोधणे यासाठी हा मैत्री गट कार्य करतो. खा. चव्हाण यांच्या अनुभवाचा फायदा दोन्ही देशांतील संबंधांना नवी दिशा देण्यासाठी होणार आहे.

नेतृत्वाचे मानले आभार

या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी खा. अशोकराव चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप राष्ट्रीय नेतृत्वाचे आभार मानले आहेत. या नियुक्तीमुळे नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT