Nanded Crime | दत्तक मुलगाच उठला बापाच्या जीवावर; अनैतिक संबंधातून माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला

पुत्रासह प्रेयसीला ५ दिवसांची पोलीस कोठडी; मंगरूळ येथील खळबळजनक घटना
Nanded Crime | दत्तक मुलगाच उठला बापाच्या जीवावर; अनैतिक संबंधातून माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला
Pudhari
Published on
Updated on

हिमायतनगर : तालुक्यातील मंगरूळ येथे अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याच्या रागातून एका माजी सरपंचावर त्यांच्या दत्तक मुलाने प्रेयसीच्या मदतीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दत्तक पुत्रासह त्याच्या प्रेयसीला अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमकी घटना काय?

मंगरूळचे माजी सरपंच बबनराव खंदारे हे १६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री नेहमीप्रमाणे शेतात झोपले होते. यावेळी आरोपी युवतीने लोखंडी पाईपाने त्यांच्या डोक्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात खंदारे गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.

Nanded Crime | दत्तक मुलगाच उठला बापाच्या जीवावर; अनैतिक संबंधातून माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला
Nanded Crime News : १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; नराधमास २० वर्षे सश्रम कारावास

मालमत्ता आणि अनैतिक संबंधाची किनार

बबनराव खंदारे यांना स्वतःची संतती नसल्याने त्यांनी आपल्या भावाचा मुलगा खंडू खंदारे याला दत्तक घेतले होते. खंदारे यांच्याकडे २५ ते ३० एकर बागायती जमीन आहे. दरम्यान, खंडू याचे गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते, ज्याला बबनराव यांचा विरोध होता. हाच अडथळा दूर करण्यासाठी दोघांनी संगनमताने हा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

प्रकृती चिंताजनक

जखमी खंदारे यांच्यावर सध्या नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेला आठवडा उलटूनही (२४ फेब्रुवारीपर्यंत) ते शुद्धीवर आलेले नाहीत. त्यांची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे समजते.

Nanded Crime | दत्तक मुलगाच उठला बापाच्या जीवावर; अनैतिक संबंधातून माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला
Nanded Crime | बिलोलीत मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्षे सश्रम कारावास

पोलीस कारवाई

हिमायतनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. तपासादरम्यान गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता सहायक पोलीस निरीक्षक शेख यांनी वर्तवली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय अधिकारी हाके, पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार ए. पी. शेख, जमादार विजय कलाले आणि श्यामसुंदर नागरगोजे यांचे पथक करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news