Nanded News : अल्पवयीन मुलीची छेडछाड अन् जिवे मारण्याची धमकी; अवघ्या ७२ तासांत दोषारोपपत्र दाखल file photo
नांदेड

Nanded News : अल्पवयीन मुलीची छेडछाड अन् जिवे मारण्याची धमकी; अवघ्या ७२ तासांत दोषारोपपत्र दाखल

कंधार येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात ही चार्जशीट सादर करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Molestation of a minor girl and death threats; charge sheet filed within just 72 hours

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिची छेडछाड करणाऱ्या आणि लग्नास नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध उस्माननगर पोलिसांनी जलदगती कारवाई करत अवघ्या ७२ तासांत दोषारोपपत्र दाखल केले आहे. कंधार येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात ही चार्जशीट सादर करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साईनाथ विठ्ठल नाईनवड (रा. उस्माननगर, ता. कंधार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सार्वजनिक रस्त्यावर आणि गल्लीत पीडित मुलीला हातवारे करून बोलावत असे. तसेच कोणी नसताना तिचा पाठलाग करून लग्नासाठी तगादा लावत होता. नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.

याप्रकरणी १८ नोव्हेंबर रोजी उस्माननगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेसह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी आरोपीला अटक केली. तपास अधिकारी उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी यांनी तात्काळ तांत्रिक व साक्षीदारांचे पुरावे गोळा करत तपास पूर्ण केला.

२० नोव्हेंबर रोजी कंधार येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र (स्पेशल कोर्ट केस क्र. ४८/२०२६) दाखल करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील जुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश मुळीक, उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी व पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT