BJP Pudhari
नांदेड

Nanded News : नांदेडला भाजपचे बी. फॉर्म चव्हाणांकडे

निश्चित उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना, एकीकडे चर्चेचे गुऱ्हाळ मात्र सुरूच

पुढारी वृत्तसेवा

In Nanded, the BJP's B-form is with Chavan.

नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची ८१ उमेदवारांची यादी निश्चित झाली असून निश्चित उमेदवारांना नियोजित खर्चासह कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे आणि त्याचदिवशी दुपारपर्यंत बी. फॉर्म वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एकीकडे शिवसेनेसोबत युतीच्या चर्चेचे गुन्हाळ कायम ठेवत दुसरीकडे भाजपाने 'एकला चलो रे'च्या भूमिकेतून नियोजन सुरु केले आहे. शुक्रवारी संभाजीनगर येथे झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर नांदेडमध्ये शनिवारी खा. अशोक चव्हाण, खा. अजित गोपछडे, माजी मंत्री डी. पी. सावंत, महानगराध्यक्ष अमर राजूरकर यांच्या उपस्थितीत बैठकांच्या दोन फेऱ्या झाल्या. बैठकीत निश्चित उमेदवार यादी व पुढील रणनितीवर चर्चा झाल्याचे समजते.

मागील निवडणुकीत निवडून आलेल्या बहुतांश नगरसेवकांचा या यादीत समावेश असल्याचीही माहिती आहे. तसेच मागील दोन दिवसांत नव्याने प्रवेश घेतलेल्या माजी नगर सेवकांनाही कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांवर नांदेड महापालिका निवडणुकीचा भार सोपविण्यात आला आहे.

भाजपाने महापालिका निवडणुकीसोबतच जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही सर्व्हे केला असून या सर्व्हेमध्ये भारी ठरलेल्या इच्छूक उमेदवारांची आयटीएममध्ये शनिवारी दुपारी बैठक झाली. यात त्यांच्यावर महापालिकेची प्रभागनिहाय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.जि.प. निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता, खर्च उचलण्याची तयारी असलेल्या निवडक इच्छुकांनाच या बैठकीसाठी आमंत्रित केले होते. मनपा प्रभागनिहाय जबाबदारी पार पाडताना खर्चाचा भारही या उमेदवारांना उचलावा लागणार आहे.

गोपछडे चव्हाणांमध्ये तणाव..

भाजपच्या सर्व जागांसाठीचे बी. फॉर्म खा. अशोक चव्हाण यांच्याकडे उपलब्ध झाल्याची माहिती आहे. त्यामुळे शनिवारी आयटीएममध्ये उमेदवारांच्या यादीवर चर्चा सुरु असताना खा. गोपछडे यांनी त्यांच्या यादीतील काही उमेदवारांसाठी आग्रह धरला होता. यावरून दोघांमध्ये काही काळ ताणाताणी झाल्याचीही माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT