

Ten cattle and a vehicle, along with other goods worth 17 lakhs, were seized.
नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेड जिल्ह्यातून अवैधरीत्या गोवंशाची वाहतूक करण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत जिल्ह्यात कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांना दिले आहे. शुक्रवार दि. २६ रोजी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने गोवंशाची तस्करी करताना पकडले. आरोपींकडून दहा गोवंश व ट्रक असा १७ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक शुक्रवारी रात्री गस्तीवर असताना विष्णुपूरी कॅनलजवळ एम. एच. २६ बी.ई. ४९४६ क्रमांकाच्या ट्रकमध्ये गोवंश जातीचे दहा जणावरे अत्यंत निर्दयीपणे, कोंबून नेत वाहतूक करताना आढळली. पोलिस जमादार कुसमे, जमादार तेलंगे, कल्याणकर यांच्या पथकाने ही कारवाई करत तब्बल १७ लाख ३० हजाराचा मुद्देमालजप्त केला.
या प्रकरणी पोलिस जमादार मार- ोती शंकरराव पंचलिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी जबीउल्लाखान जहीरउल्लाखान रा. खुदबेनगर, नांदेड व मोहमंद सरवर मोहंमद गौस, शेख कलीम, कुरेशी, शेख उमर कुरेशी सर्व रा. नांदेड या चार जणां विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.