चिखलीकर परिवारासोबत आयुष्यभर राहणार

लोह्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार यांची भावना
Nanded News
चिखलीकर परिवारासोबत आयुष्यभर राहणारFile Photo
Published on
Updated on

I will stay with the Chikhlikar family for life Newly elected mayor Sharad Pawar

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: आपण सदैव चिखलीकर परिवारासोबतच राहणार होतो. पण दरम्यानच्या काळात आपण दिशाहीन झालो होतो. यापुढे मी सदैव चिखलीकर परिव-ाराशी घनिष्ठ राहणार आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे, असे भावनिक उद्‌गार लोहा नगरपरिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष शरद नामदे वराव पवार यांनी काढले.

Nanded News
भाजपाच्या मदतीसाठी नांदेडमध्ये 'मजपा'ची एन्ट्री !

नांदेड येथील वसंतनगरमधील साईसुभाष या निवासस्थानी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी शनिवारी दि. २७डिसेंबर रोजी चिखलीकर कुटुंबीयांचा सामूहिक सत्कार सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी चिखलीकर कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे लोहा नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार तसेच नगरसेवकांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, सौ. प्रतिभाताई पाटील चिखलीकर, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, तसेच सचिन पाटील चिखलीकर यांचा सत्कार करण्यात आला.

Nanded News
दहा गोवंश व वाहनासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

यावेळी नगराध्यक्ष पवार म्हणाले की, नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो असलो तरी त्याचे संपूर्ण श्रेय आमदार चिखलीकर यांचे आहे. त्यामुळे मी कधीही चिखलीकर कुटुंबाला सोडून जाणार नाही.

या कार्यक्रमास माणिकराव मुकदम, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, डॉ. संजय गुंडावार, काकाजी पवार, माजी सभापती बालाजी पाटील, माजी उपसभापती बळीराम पाटील कदम, शंकर पाटील ढगे, साईनाथ कपाळे, केशवराव मुकदम, नगरसेवक केशवराव मुकदम, करीम शेख, हरिभाऊ चव्हाण, अविनाश कदम, मारुती जंगले, दत्ता शेट्टे, बालाजीराव पांडागळे, भानुदास पाटील पवार, यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगर-सेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news