Re-NEET 2026 result pudhari photo
नांदेड

Re-NEET 2026 result : नीट निकालात आयआयबीचे विद्यार्थी ठरले धुरंधर!

अवघड पेपर मध्येही तब्बल ६० विद्यार्थ्यांना ६०० पेक्षा जास्त गुण!

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : ३ मे रोजी झालेली नीट परीक्षा रद्द करून २१ जुन रोजी नीट पुनर्परीक्षा (रीनीट) घेण्यात आली होती. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या निकालात आयआयबी च्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ६० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा जास्त मार्क्स मिळवले आहेत. देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत नीट (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) ही सर्वात महत्त्वाची परीक्षा मानली जाते.

राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) मार्फत दरवर्षी आयोजित होणाऱ्या या परीक्षेच्या माध्यमातून एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएसएमएस तसेच इतर वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो. नीट परीक्षेतील गुणवत्तेनुसार देशभरातील सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश निश्चित होत असल्याने दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जातात.

नीट २०२६ निकालात आयआयबी च्या सूर्यवंशी सार्थक धनराज याने (६७५), भिसे विशाल कोंडिबा (६६२), देशमुख अर्जुन गणेश (६५६), कोंडा विकास विनोदकुमार (६५४), ब्याळे गणेश मल्लिकार्जुन (६५२), येवतीकर शिवम सूर्यकांत (६५१), बोलपिलवाड महेश माधव (६४९), पाटील यशराज राजेंद्र (६४३), सवंडकर हर्षवर्धन विकास (६४१). इतर ६० विद्यार्थ्यांना ६०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. आयआयबी आहे तर विश्वास आहे गुणवत्तेचा इतिहास आहे हे ब्रीद सिद्ध झाल्याचे आयआयबी चा टॉपर सार्थक याने सांगितले.

यावर्षी एम्स सह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस साठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढणार असल्याची खात्री यावेळी आयआयबी व्यवस्थापनाने व्यक्त केली. दोन वर्षांच्या तयारी दरम्यान विद्यार्थ्यांची मानसिकता सांभाळणे, त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे आणि बाहेर घडणाऱ्या घडामोडींपासून त्यांना सावध करणे, अतिरिक्त आणि सातत्यपूर्ण सराव असे चौकस कार्य टीम आयआयबी ने केल्याबद्दल विद्यार्थी आणि पालक कृतज्ञता व्यक्त करत आहेत. या निकालाने आयआयबी वरील विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास द्रुढ झाला असून टीम आयआयबी ने केलेल्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आयआयबी ची मान उंचावली आहे.

नीट परीक्षेत आयआयबी ने आत्तापर्यंत अनेक उच्चांक प्रस्थापित केले असून २० हजार पेक्षा जास्त एमबीबीएस डॉक्टर्स घडवणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळवले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत त्यांच्या सुरक्षेची काळजी सुद्धा आयआयबी व्यवस्थापन घेत असते. पालक आणि विद्यार्थ्यासाठी वेळोवेळी समुपदेशन कार्यशाळा त्यांचे शंका निरसन इत्त्यादी उपक्रम आयआयबी कडून राबवले जातात. अनुभवी शिक्षक, परिपूर्ण व्यवस्थापन, अद्ययावत कॅम्पस, संशोधन करून बनवलेले स्टडी मटेरीअल, नीट सह बोर्ड परीक्षेची परिपूर्ण तयारी यामुळे आयआयबी कडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे दिसत आहे.

विद्यार्थी, पालकांचा अढळ विश्वास आणि टीम आयआयबी ची अथक मेहनत हीच आमच्या यशस्वी निकालामागील खरी ताकद आहे. हा निकाल केवळ आकड्यांचा नाही, तर विश्वास, समर्पण, सातत्य आणि गुणवत्तेच्या प्रवासाचा १०० टक्के ओरिजिनल पुरावा आहे.
दशरथ पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT