वादळी वाऱ्यामुळे आसरखेड्यात दाणादाण file photo
नांदेड

वादळी वाऱ्यामुळे आसरखेड्यात दाणादाण

रब्बीतील पिकांसह सोलर प्लेटचेही नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Havoc Wreaked in Asarkheda Due to Gusty Winds

डोणगाव, पुढारी वृत्तसेवाः बदनापूर तालुक्यातील आसरखेडा शिवारात वादळी वारा व पावसामुळे रब्बीतील गहू, ज्वारीसह शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर प्लेटचे मोठे नुकसान झाले.

आसरखेडा परिसरात बुधवारी वादळी वारे व ढगाळ वातावरण नंतर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, शाळू ज्वारी, बाजरी, मका, कांदा, द्राक्ष व आंबासह भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे शेतामध्ये विहिरीवर बसविलेल्या सोलार पंपाच्या प्लेटना तडे गेले तसेच पाट्या फुटल्या.

शासनाच्यावतीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यातून करण्यात येत आहे. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT