Social Media   File Photo
नांदेड

नांदेडच्या गँगवॉरमधील फरार कबुतराची थेट इंस्टाग्रामवर पोस्ट

आरोपी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : पुढारी वृत्तसेवा : तीन दिवसांत ५ खुनांनी नदिडच सामाजिक शांतता भंग झाली आहे. पोलीस आरोपींच्या मागावर आणि आरोपी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. सध्या गुन् हेगारांचा डिजिटल सुळसुळाट पाहस्यला मिळतोय. नांदेडमधील हत्याकांडातील धरार शमला नाही, तोच आता एका फरार गुंडाने थेट G पोलिसांच्या अनूवर घाला घातला आहे.

गँगवॉरमधील प्रमुख आरोपी शेख शाहरुख उर्फ शाहरुख कबुतर याने चवा इंस्टाग्रामवर स्टोरी अपलोड करत पोलिसांना उघड आव्हान दिलंय. 'पोलिस शोधतायत आणि मी पोस्ट टाकतोय', अशा थाटात त्याने खाकी बर्दीची झोप उडवली आहे.

गुंड शाहरुख कबुतरने आपल्या इंस्टाग्राम आयडीवर दोन स्टोरीज टाकल्या आहेत. यात त्याने भावनिक कार्ड खेळतानाच आपण परत येणार असल्याचे संकेत दिले आहेत, त्याने आपल्या स्टोरीमध्ये बॅकग्राउंडला गाणे लावत लिहिले आहे:

"बस मेरी माँ को संभाल लेना तुम, बहोत परेशान हो जायेगी वो... तेरा लाडला लौटेगा जरूर, तू रोना मत!" एकीकडे पोलीस कोम्बिंग ऑपरेशन करून गल्लीबोळ पिंजून काढत आहेत आणि दुसरीकडे हा सराईत गुन्हेगार इंटरनेटच्या माध्यमातून पोलिसांना "पकडू शकता तर पकड़ा" असेच चॅलेंज देत आहे.

गुन्हेगारी विश्वात शाहरुखला कबूतर का म्हणतात, याची चर्चा आता रंगू लागली कबुतरासारखा भुर्रकन उडून जायचे आणि पोलिसांच्या हाती लागायचे नाही, ही त्याची जुनी पद्धत असल्याचे त्याचे पंटर सांगतात. शुक्रवारी रात्री डी-मार्ट जवळ झालेल्या सदा आणि साई लाला गंगच्या राड्यात शाहरुख सक्रिय होता. या घटनेत तो जखमी झाल्याची चर्चा असतानाच त्याने सोशल मीडियावर हजेरी लावून सर्वांनाच चकित केले आहे.

नांदेड पोलिस बॅकफूटवर?

गेल्या ७२ तासांत नांदेडमध्ये ५ खून झाले आहेत. त्यातच रुग्णालयात घुसून पोलिसांच्या डोळ्यादेखत झालेली हत्या नांदेड पोलिसांसाठी मोठी नाचक्की ठरली होती. आता फरार आरोपींनी सोशल मीडियावर उच्छाद मांडल्यामु‌ळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. "गुन्हेगारांना पोलिसांची भीती उरली नाही का?" असा संतप्त सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत.

दहशतीचा डिजिटल अवतार

नांदेडच्या गैंगवॉरचा हा राडा आता केवळ रस्त्यावर उरला नसून तो सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचला आहे. आरोपी शाहरुखने आपल्या प्रेयसीसाठी आणि आईसाठी ठेवलेल्या या स्टोरीज म्हणजे केवळ भावना नसून, पोलिसांना दिलेली एक प्रकारची खुली धमकीच मानली जात आहे. आता नांदेडचे सिंघम या कबुतराची उड्डाण रोखून त्याला जेरबंद करणार की हे चॅलेंज पोलिसांच्या पचनी पडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT