दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक pudhari photo
नांदेड

Nanded Crime : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक

गावठी पिस्तूलसह दीड लाखाचे साहित्य जप्त

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : नांदेड जवळील पांगरी शिवारातील कालव्या जवळ गस्तीवर असलेल्या पोलिसांना काहींच्या संशयास्पद हालचाली वाटल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली. यावेळी तीन जण फरार झाले. ताब्यात घेतलेल्या चार जणांची झडती घेतली असता दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार जणांकडे गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुस, एक खंजर, मिर्ची पुढं, लोखंडी पाईप, तीन मोबाईल असे दीड लाख रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले.ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने सोमवारी ही कारवाई केली.

या बाबत अधिक माहिती अशी की, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, सुनिल भिसे, जमादार वसंत केंद्रे संतोष पवार यांचे पथक सोमवारी पहाटे गस्तीवर असताना पांगरी शिवारात कालव्या जवळ कांही व्यक्तींच्या संशस्पद हालचाली दिसल्या, त्यामुळे पोलिसांनी शेख अयान शेख मुजीब (वय 19) महेबुब शेख सलीम (वय 21), शुभम शिवाजी जाधव (वय 27) सर्व राहणार नांदेड यांना ताब्यात घेतले, यातील तीन जण फरार झाले. ताब्यात घेतलेल्या चार जणांसह दरोड्याच्या सात जणां विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुस, एक खंजर, मिर्ची पुढं, लोखंडी पाईप, तीन मोबाईल असे दिड लाख रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. पकडण्यात आलेल्यांची पोलीस चौकशी करत असून, त्यांच्याकडून अनेक गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT