Nanded Municipal Corporation : नांदेडच्या महापौरपदी कविता मुळे; उपमहापौरपदी दीपकसिंह रावत!

भाजपला 50 सदस्यांचे पाठबळ; राष्ट्रवादी तटस्थ
Nanded Municipal Corporation
नांदेडच्या महापौरपदी कविता मुळे; उपमहापौरपदी दीपकसिंह रावत!pudhari photo
Published on
Updated on

नांदेड ः नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या कविता संतोष मुळे आणि उपमहापौरपदी दीपकसिंह रावत यांची मंगळवारी अधिकृत घोषणा करण्यात आली. या दोन्ही पदांसाठी भाजपच्या बाजुने 50 सदस्यांचा पाठींबा मिळाला. एमआयएम उमेदवाराला 14 तर काँग्रेस-वंचित आघाडीच्या उमेदवाराला 15 मते मिळाली. राष्ट्रवादीचे दोन्ही सदस्य तटस्थ राहिले. या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून प्रचंड जल्लोष केला.

नांदेड महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीसाठी मंगळवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. एमआयएम आणि काँग्रेस-वंचित आघाडीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे हात वर करून निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

Nanded Municipal Corporation
Ashok Chavan : मनपातील कारभार लोकाभिमुख व पारदर्शक असावा

महापौरपदासाठी कविता संतोष मुळे आणि उपमहापौरपदासाठी दीपकसिंह रावत यांच्या बाजूने 50 सदस्यांनी कौल दिला. यात भाजपचे 45, शिवसेनेचे 4 आणि अपक्ष मीनल पाटील यांचा समावेश आहे. तर एमआयएम उमेदवारांना प्रत्येकी 14 आणि काँग्रेस-वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूने प्रत्येकी 15 सदस्यांनी हात वर केले. 81 सदस्यीय नांदेड महानगरपालिकेत भाजपचे 45, शिवसेना - 4, काँग्रेस-वंचित आघाडीचे 15, एमआयएमचे 14, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि अपक्ष -1 असे पक्षीय बलाबल आहे.

Nanded Municipal Corporation
Disappearing folk traditions : नव्या व्यवस्थेच्या गोंगाटात हरवला ‌‘वासुदेव‌’चा सूर..!

एमआयएम-भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

निवडीनंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‌‘जय श्रीराम‌’व ‌‘मोदी-मोदी‌’अशा घोषणा दिल्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून एमआयएमच्या नगरसेवक व समर्थकांनी ‌‘अल्ला हू अकबर‌’असे नारे दिले. दोन्ही गटाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत एकमेकांसमोर आल्याने मनपा परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

  • महापौर कक्षात फुलांची सजावट करून महापौरांची खुर्ची व टेबल सुसज्ज करण्यात आले होते. एकीकडे महापौर-उपमहापौरपदासाठी निवड प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे या कक्षात स्व.शंकरराव चव्हाण यांच्या फोटो शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, खा.अशोक चव्हाण यांचे फोटो लावण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरु होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news