Burglary Case : नांदेडात आठ लाखांची घडफोडी करणारे पाच जण गजाआड File Photo
नांदेड

Burglary Case : नांदेडात आठ लाखांची घडफोडी करणारे पाच जण गजाआड

पोलिसांनी चोरीचा लावला छडा; २४ तासांत रोकड जप्त

पुढारी वृत्तसेवा

Five arrested for ₹8 lakh burglary in Nanded

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : घर बदलताना डॉक्टरांच्या पलंगाच्या बॉक्समधील तब्बल ८ लाख १२ हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या पाच मजुरांच्या टोळीला इतवारा पोलिसांनी अवघ्या काही तासांत गजाआड केले आहे.

पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेत चोरीस गेलेली संपूर्ण १०० टक्के रक्कम जप्त केली असून, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी इतवारा पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिलाल नगर येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. शेख शहबाज शेख जाफर हे २४ जुलै रोजी मदिनानगर येथून तरोडा बु. येथे घर हलवत होते. सामान भरताना मजुरांनी डॉक्टरांची कमाई व अपघाताच्या विम्याची ८ लाख १२ हजारांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी २९ जुलै रोजी इतवारा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

या पथकाने बजावली कामगिरी प्रवीण आगलावे यांच्यासह पोलीस ही यशस्वी कारवाई गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक साहेबराव जगताप, बंडू कलंदर, शेख अंमलदार रेवणनाथ कोळनूरे, इजरायल, मारोती गीते, हरप्रीतसिंघ सुखई व शेख शबाना यांच्या पथकाने पार पाडली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण रक्कम सुरक्षित मिळाल्याने पीडित डॉक्टरांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, नागरिकांमधून इतवारा पोलिसांचे कौतुक होत आहे.

तपासाची चक्रे फिरवली अन् रोकड जप्त

घटनेचे गांभीर्य ओळखून इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे व पोलीस निरीक्षक रामेश्वर भोगुजी खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तात्काळ कारवाईस सुरुवात केली. पथकाने अवघ्या काही तासांतच आरोपी मजूर पिराजी वाघमारे, सुनील रॅपनवाड, सुनील चिमनाजी वाघमारे, साहेबराव वाघमारे आणि तनुष्क मेटकर यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता चोरी गेलेली ८ लाख १२ हजार रुपयांची संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात यश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT