एक वर्षाच्या चिमुकल्यासाठी अग्निशमनची टीम बनली देवदूत file photo
नांदेड

एक वर्षाच्या चिमुकल्यासाठी अग्निशमनची टीम बनली देवदूत

रेस्क्यू ऑपरेशन करून केली सुटका स्मार्ट लॉकमुळे सव्वातास अडकला शिवांश

पुढारी वृत्तसेवा

Firefighters become angels for one-year-old baby

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : खेळण्यात गुंग असलेल्या एक वर्षाचा चिमुकल्या शिवांशच्या घरातील आतील दरवाजा स्मार्ट लॉकमुळे अचानक बंद झाला.

त्यामुळे शिवांशला काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र, त्यांना कुणालाही यश आले नाही. शेवटी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि शिवांशची अवघ्या काही मिनिटांत सुटका केली. गेल्या सव्वा तासांपासून कुटुंबासह अनेकांचा जिव टांगलेला होता. शिवांशच्या सुटकेमुळे अनेकांचा जिव भांड्यात पडला. ही घटना नांदेड शहरातील हनुमानगढ परिसरातील केशवनगर भागात गुरुवारी (दि. ५) दुपारी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड शहरातील हनुमानगढ परिसरातील केशव नगर येथील एका वृंदावन नावाच्या तीन मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सतीश कंकरे यांचे घर आहे. सतीश कंकरे बाहेर कामानिमित्त गेले होते. त्यांची पत्नी व एक वर्षांचा मुलगा शिवांश घरात होते. दुपारी तीनच्या सुमारास शिवांश घरातील आतल्या खोलीत खेळणी खेळत होता.

मुलगा खेळत आहे म्हणून आई कामात मग्न झाली. मात्र, याचवेळी स्मार्ट लॉक असलेला डोअर लॉक झाला. हे कुणाच्याही लक्षात आले नाही. शिवांश आई दिसत नसल्याने तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, दरवाजा लॉक झाल्याचे त्या चिमुकल्याच्या लक्षात आले नाही. मात्र आईने दरवाजा लॉक झाल्याने तो लॉक काढण्याचा प्रयत्न केला आजूबाजूच्या लोकांना बोलावून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पाहता-पाहता गर्दी जमायला सुरुवात झाली. लॉक उघडण्यापासून इतर अनेकांना फोन लावले मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही.

शिवांशच्या काकांनी अग्निशमन टिमला फोन केला त्यावेळी तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवत इमारतीच्या पाठीमागच्या बाजूने खिडकीच्या ठिकाणी ३५ फिट अॅल्युमिनियम एक्सटेन्शन लेडर लावून खिडकीच्या आतमध्ये फायर हुकद्वारे बंद झालेल्या दरवाजाचे कडी काढून चिमुकल्या शिवांशची सुटका करत अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे व उप अग्निशमन अधिकारी नीलेश कांबळे, उमेश ताटे, नरवाडे, मगरे, पठाण व वाहन चालक श्री एस नरवाडे हे शिवांशसाठी देवदूत बनले. दरम्यान शिवांशची सुटका केल्याने त्याच्या आई-वडिलांने अग्निशमन जवानांचे आभार मानले.

अग्निशमन टीमने २० मिनिटांत केली सुटका

नांदेड शहरात एक मुलगा घरात अडकल्याची माहिती अग्नशमन टिमला दुपारी ३.५५ मिनिटांना मिळाली त्यानंतर रेस्क्यू टिमला घेऊन घटनास्थळावर पोहचून ३५ फूट अॅल्यूमिनियम एक्सटेन्शन लेडरचा वापर करून फायर हुकद्वारे बंद दरवाजा उघडला आणि चिमुकल्या शिवांशची सुटका केली. अवघ्या २० मिनिटांत शिवांशच्या सुटका करण्यात आल्याची माहिती अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे यांनी दिली. कुठलीही आपत्ती आली तरी अग्निशमन टिमला फोन करावा, असे आवाहन दासरे यांनी यावेळी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT