Finally, Child Development Project Officer Nagamwad is suspended.
मुखेड, पुढारी वृत्तसेवा : मुखेड येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयातंर्गत कार्यरत बालविकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार व्यंकटराव नागमवाड यांना नियमबाह्यअंणवाडी भरती प्रकरणी निलंबीत करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
गणवाडी कर्मचारी भरतीस शासनाने स्थगिती दिली असताना व उच्छा येथील भरती प्रकरणी न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही मिथुनकुमार नागमवाड यांनी महसुली गावात नियम व निकष बाजुला ठेवुन भरती केल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर नागमवाड यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या नियमाचा भंग केल्याने ते शिस्तभंग कार्यवाहीस पात्र झाले.
महाराष्ट्राचे राज्यपालांनी नागरीसेवा (शिस्त व अपील) नियमानुसार त्याना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन मिथुनकुमार बागमवाड बाल विकास प्रकल्प अधिकारी शासन आदेशानुसार त्यांना निलंबित करण्यात आले आहे. हेआदेश अमलात असेपर्यंत नागमवाड यांचे मुख्यालय विभागीय उप आयुक्त महिला व बाल विकास छञपती संभाजीनगर असुन त्यांच्या पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडु नये असेही आदेशीत करण्यात आले आहे.