आशा बळावली; पण आकांक्षा अयशस्वी ठरली ! file photo
नांदेड

आशा बळावली; पण आकांक्षा अयशस्वी ठरली !

पीपल्स महाविद्यालयाचे उपप्राचार्य अशोक सिद्धेवाड यांना उद्या निरोप

पुढारी वृत्तसेवा

Farewell to People's College Vice Principal Ashok Siddhewad tomorrow

विशेष प्रतिनिधी

नांदेड : सेवा समाप्तीनंतरच्या निवृत्तीवेतन प्रस्तावाची संचिका थांबलेली. पीपल्स कॉलेजमधील प्राचार्यपदाच्या मुलाखती तसेच निवड प्रक्रिया ३१ मार्चपूर्वी पूर्ण होईल, ही आशा बळावलेली... या दरम्यान बऱ्याच घडामोडी झाल्या आणि उपप्राचार्य पदावरून प्राचार्यपदावर झेप घेण्याची डॉ. अशोक सिद्धेवाड यांची आकांक्षा अखेर अयशस्वी ठरली. आता त्यांना सोमवारी (दि.३०) निरोप घ्यावा लागणार आहे!

शिक्षणक्षेत्रातील दिग्गजांनी पीपल्स चे उपप्राचार्य डॉ. अशोक सिद्धेवाड प्राचार्यपद भूषविले आहे. या कॉलेजचे नवे प्राचार्य कोण, हे आता पुढील महिन्यात स्पष्ट होईल. या पदासाठी 'नांएसो 'कडे ११ अर्ज आले आहेत. त्यात सिद्धेवाड यांचाही अर्ज आहे. मुलाखती तसेच निवड प्रक्रिया ३१ मार्चपूर्वी पूर्ण झाली असती, तर त्यांना शासन मान्यतेच्या अधिन राहून संधी होती.

काही हितचिंतकांनी तशी योजनाही आखली होती; पण २८ रोजी निश्चित झालेल्या मुलाखती शिक्षण सहसंचालकांनी लांबणीवर टाकल्या आणि तेथेच वरील 'योजनावीरां'ची निराशा झाली. सिद्धेवाड यांच्या वयास १४ मार्च रोजी ६० वर्षे पूर्ण झाली. पण नियमातील तरतुदीनुसार त्यांना ३१ मार्चपर्यंत सेवेत राहण्याची संधी मिळाली. या दरम्यान त्यांनी प्राचार्यपदासाठी संस्थेच्या दप्तरी आपला अर्ज दाखल केला, तो छाननीमध्ये कदाचित पात्र ठरवला गेला असेलही; पण त्यांची सेवा सोमवारीच समाप्त होत असल्यामुळे ते मुलाखतीस पाचारण करण्यासाठी आपोआप अपात्र झाल्याचे सांगितले जात आहे; पण या माहितीस दुजोरा मिळाला नाही.

एरवी अनेक महाविद्यालयांत प्राचार्यपद कधी रिक्त होते अन् कधी भरले जाते, हे संबंधित वगळता कोणाच्याही लक्षामध्ये येत नाही; पण पीपल्स कॉलेजमध्ये प्राचार्य पदभरतीसंदर्भातील अनेक बाबी 'लक्षवेधी' उरल्या.

जाहिरातीच्या मसुद्यास विद्यापीठाची मान्यता घेण्यापासून ते वरील पदांच्या मुलाखतींची तारीख झटपट ठरवण्यापर्यंत सिद्धेवाड यांजवर 'बालाजी कृपा' राहिल्याचे दिसून आले. शिक्षण सहसंचालकांस मुलाखतीची तारीख निश्चित करून देण्याविषयीचे पत्र (दि.१८ मार्च) झटपट तयार झाले... ते संबंधित कार्यालयास सादर झाले आणि त्याचदिवशी त्याचे अपेक्षित उत्तरही मिळवले गेले. या घडामोडींमध्ये स्वतः सिद्धेबाद अलिप्त होते. त्यांना प्राचार्यपदावर बसविण्याचा विडा शबनम बंगधारी माजी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT