Peoples College principal recruitment | प्राचार्यपद : पीपल्स कॉलेजमध्ये आता प्रक्रिया सुरळीत!

एप्रिलमध्ये प्राचार्यपदाच्या मुलाखती होणार
Peoples College principal recruitment
Peoples College principal recruitmentpudhari photo
Published on
Updated on

विशेष प्रतिनिधी

नांदेड ः पीपल्स कॉलेजच्या प्राचार्य पदासाठी निर्धारित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी तसेच ‌‘नांएसो‌’च्या छाननी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच मुलाखतींची तारीख (दि.28 मार्च) निश्चित करण्याचा निर्णय संबंधित कार्यालयाकडून मागे घेण्यात आल्यानंतर आता संपूर्ण प्रक्रिया सुरळीत झाली आहे.

वरील महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाची धामधूम सोमवारी सुरू झाली. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात संस्थाध्यक्ष तसेच ‌‘कार्यप्रवीण उपाध्यक्ष‌’ हे दोघेही सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत संस्था सचिव श्यामल दीपनाथ पत्की समारंभाध्यक्ष या नात्याने हजर होत्या.

Peoples College principal recruitment
Renapur theft cases increase : रेणापूर तालुक्यात चोरी, लुटीच्या घटनांमध्ये वाढ

स्नेहसंमेलनाचा उत्साही धमाका सुरू असतानाच या कॉलेजच्या प्राचार्यपदासाठी 28 मार्चला होऊ घातलेल्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्याची वार्ता संस्था तसेच कॉलेज प्रशासनाकडे आली. ही वार्ता अनेकांसाठी सुखद; पण एका प्राध्यापकासाठी मात्र अत्यंत दुःखद ठरली, असे सांगण्यात आले.

या कॉलेजशी संबंधित एका गटाने प्राचार्यपदाच्या मुलाखतींसाठी 31 मार्चपूर्वीचा मुहूर्त निघण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बरेच खटाटोप केले; पण यांतील काही महाभागांमुळे संस्थेची बदनामी झाल्याचा सूर आता निघाला आहे. विद्यापीठ व्यवस्थापन समितीतील एका सदस्याच्या अतिउत्साहामुळे संस्थेवर मोठी नामुष्की ओढवली. तत्पूर्वी झालेल्या वेगवेगळ्या खटाटोपांत मोठे अर्थकारण झाल्याचे बोलले जात आहे.

पीपल्स कॉलेजला अत्यंत कार्यकुशल, नैतिक मूल्यांची बूज राखणाऱ्या विद्वान प्राचार्यांची परंपरा लाभली आहे; पण आता विद्यमान बेकायदेशीर पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात नव्या प्राचार्यांच्या नेमणूक प्रक्रियेत अत्यंत चुकीच्या, नियमबाह्य व आक्षेपार्ह बाबींची नोंद होत चालली होती. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील काही जागरुक प्राध्यापकांनी त्यास अतिशय संयतपणे आपला विरोध दर्शविल्यानंतर होऊ घातलेल्या चुकांची संबंधितांकडून दुरुस्ती होत असल्याचे दिसून येत आहे.

प्राचार्यपदाच्या मुलाखतींसाठी विद्यापीठाकडून तीन विषयतज्ज्ञ तसेच कुलगुरूंचे दोन प्रतिनिधी पाठविले जातात. ही सर्व नावे 9 मार्च रोजीच संस्थेला कळविण्यात आली. प्राचार्यपदासाठी आलेल्या अर्जांची छाननी करणाऱ्या संस्थेच्या समितीचा अहवाल संस्थेमार्फत संबंधितांकडे सादर करण्यात आल्यानंतर सर्वांना सोयीची ठरेल, अशी तारीख निश्चित करून मुलाखतींची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी शिक्षण संचालकांच्या प्रतिनिधीवर असते.

या प्रतिनिधीने आधी घाईगडबडीत 28 तारीख निश्चित करून टाकली; पण या कृतीचा परिणामकारक समाचार घेतला गेल्यानंतर स्थानिक सहसंचालक कार्यालयाने मुलाखतींची तारीख बदलण्याचा निर्णय रविवारीच घेतला. त्यानुसार 28 तारखेच्या मुलाखती आता लांबणीवर गेल्या आहेत.

Peoples College principal recruitment
RTE admission location issue : आरटीई प्रवेशाचा ‌‘लोकेशन‌’चा गोंधळ; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

पीपल्स कॉलेजमध्ये संपर्क साधला असता, प्राचार्यांसह सर्व संंबंधित स्नेहसंमेलनाच्या धामधूमीमध्ये व्यग्र होते; पण मुलाखतींची तारीख लांबणीवर पडली असल्याच्या माहितीस ‌‘नांएसो‌’च्या कार्यालयातून दुजोरा मिळाला. प्राचार्यपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपुष्टात आली.

या पार्श्वभूमीवर छाननी समितीतील सदस्यांना बैठकीसंबंधीचा निरोप देण्यात आला. या समितीची पहिली बैठक मंगळवारी सायंकाळी झाल्याचे सांगण्यात आले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समितीचा अहवाल विद्यापीठ तसेच शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर एप्रिलमध्ये प्राचार्यपदाच्या मुलाखती होतील, असे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news