Gas Cylinder : गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यात अपयश file photo
नांदेड

Gas Cylinder : गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यात अपयश

जिल्हाभरात गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा कायम; तालुकानिहाय नियंत्रण कक्ष

पुढारी वृत्तसेवा

Failure to stop black marketing of gas cylinders

नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेड जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरवठा असल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभाग करत असला तरी, घरगुती गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी वितरकांकडे ग्राहकांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ऐन-सणासुदीच्या दिवसात ग्राहकांना कृत्रिम टंचाईचा सामना करावा लागत आहे. सर्व कामधंदे सोडून ग्राहक रांगा लावून गॅससिलिंडर मिळण्याची प्रतिक्षा करत आहेत. जिल्ह्यातील गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरुच आहे. खाजगी हॉटेल्स व अस्थापनांकडे सर्रास घरगुती गॅसचा वापर सुरु असल्याने सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीला आल्याचे चित्र जिल्हाभरात पहावयास मिळत आहे.

आखाती देशात युध्द सुरु झाल्यापासून गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई होण्यास सुरवात झाली आहे. युध्द थांबत नसल्याने गॅससिलिंडर ग्राहकांचा जिव टांगणीला लागला आहे. अनेकांनी आवश्यकता नसताना गॅस सिलिंडचा साठा करुन ठेवला आहे. तर आजही काळ्याबाजारात गॅस सिलिंडर जादा दराने मिळत आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम सर्वसामान्य घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांवर होताना दिसत आहे.

नांदेड जिल्ह्यात जवळपास साडेसात लाख घरगुती गॅस सिलिंडर ग्राहक आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने घरगुती गॅसचा वापर करणारे हजारोंच्या संख्येने हॉटेल्स, गाड्यांवर छोटेमोठे दुकाने थाटले आहेत अश्यांकडे तसेच खानावळ तसेच गॅस सिलिंडवर आधारीत उद्योग धंदे आहेत. यांना व्यावासायिक गॅस परवडत नसल्याने ते घरगुती गॅसचा वापर करतात ही बाब सर्वश्रुत आहे. मात्र, आज घडीला गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने जिल्हा पुरवठा विभागाने धडक मोहिम उघडून घरगुती गॅसचा वापर करणा-यांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.

गेल्या आठ दिवसांत पुरवठा विभागाने केवळ नांदेड जिल्ह्यात शहरातील श्रीनगर भागात दहा सिलिंडर व केळी मार्केट येथून पाच सिलिंडर जप्त केले तर ग्रामीण भागातून धर्माबाद येथून पाच सिलिंडर जप्त केले. एकुण ही कारवाई अत्यंत तोकडी असून, घरगुती गॅस सिलिंडरच्या काळाबाजारावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस पाऊले उचलली गेली नाही तर पुढील काळात ही परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.

जिल्हा पुरवठा अधिका-यांनी काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात तालुका निहाय नियंत्रण कक्ष उभारण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याठिकाणी तालुकास्तरावर घरगुती गॅस सिलिंडर मिळण्यास अडचण जात असल्यास व इतर कुठलीही अडचण आल्यास नियंत्रण कक्षाकडे तक्रार करुन ते सोडवून घेऊ शकतात असे सांगण्यात आले आहे.

ऑनलाईन बुकिंग करुनही बुकिंग होत नाही, गॅस वितरकांचे फोन लागत नाहीत, सव्र्व्हर डाऊनचा फटका ग्राहकांना बसत असल्याने ग्राहक वितरकांकडे चकरा मारत आहेत. शिवाय उद्या गॅस पेटेल की नाही या चिंतेने ग्राहक वितरकाकडे रांगा लावताना दिसत आहेत. जिल्हा पुरवठा विभाग, प्रशासनाने याकडे गांभियनि लक्ष देऊन जिल्हयात होणारी गॅस टंचाई कमी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.

मोहीम तीव्र करण्याची गरज

घरगुती गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग व तालुकास्तरावरील नेमण्यात आलेल्या पथकांनी हॉटेल्स, गॅसवर आधारीत उद्योग यांचावर छापेमारी करुन कारवाई करावी त्यासाठी कारवाईची मोहीम तीव्र करावी अशी तरच गॅस सिलिंडरच्या कृत्रिम टंचाईवर आळा बसेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT