LPG Shortage News : घरगुती गॅस मिळेना, ऑनलाईन बुकिंग यंत्रणाही कोलमडली

भरउन्हात ग्राहकांची एजन्सीवर धावाधाव
LPG Shortage News
LPG Shortage News : घरगुती गॅस मिळेना, ऑनलाईन बुकिंग यंत्रणाही कोलमडलीfile photo
Published on
Updated on

Domestic gas not available, online booking system also collapsed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांची मोटी ओढाताण होत असल्याचे चित्र समोर आले आहे. ऑनलाईन बुकिंग प्रणाली कोलमडल्याने नागरिकांना प्रत्यक्ष एजन्सीवर रिकामे सिलिंडर घेऊन जावे लागत आहे. मात्र तिथेही आधी बकिंग करा, त्यानंतर पाच ते सहा दिवसांनी सिलिंडर मिळेल, असे उत्तर मिळत असल्याने उन्हातान्हात आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाती माघारी परतावे लागत आहे.

LPG Shortage News
Sambhajinagar News : जन्म-मृत्यू दाखल्यांबाबतच्या तक्रारींचे निवारण करा

गॅस टंचाईबाबत स्थानिक नागरिक म्हणाले की, ऑनलाईन बुकिंग होत नसल्याने घरगुती गॅस मिळण्यास मोठा विलंब होत आहे. परातील एक सिलिंदर आबीच संपला होता आशि आता दुसराही संपला आहे. त्याअ ाथीपासून ऑनलाईन बुकिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक कारणामुळे बुकिंग होत नाही, नंतर प्रयत्न करा, असा संदेश मिळतो.

शेवटी रिकामा सिलिंडर घेऊन एजन्सीवर जावे लागले, मात्र तिथे कर्मचाऱ्यांकडून आधी बुकिंग करा, त्याशिवाय सिलिंडर मिळणार नाही, वेटिंग मोठी आहे, महिन्याभरानंतर सिलिंडर मिळेल, अशी उत्तरे दिली जात असल्याची कैफियत नागरिकांनी मांडली. संबंधित गॅस एजन्सी व प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन ऑनलाईन बुकिंग प्रणाली सुरळीत करावी, तसेच नागरिकांना वेळेत सिलिंडर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

LPG Shortage News
कोरोनाने माणसे वाचली; माणुसकी मात्र मृत्यू शय्येवर

विभागात सिलिंडरचा पुरेसा साठा इंधन पुरवठ्याबाबत विविध प्रकारच्या बातम्या प्रसारित होत असल्या तरी नागरिकांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये. संभाजीबगर विभागातील सर्व जिल्‌ह्यांमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून, वितरण व्यवस्था विचमितपणे सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

गॅस मिळेना, हॉटेल चालकांनी पेटवल्या चुली व्यावसायिक गैस सिलिंडर मिळत नसल्याने शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट चालक मेटाकुटीला आले आहेत. सिलिंडरभावी अनेकांवर किचन बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र या संकटातून मार्ग काहण्यासाठी काही हॉटेल चालकांनी चक्क चुली पेटवल्याचे दिसून येत आहे. गॅस मिळत नसल्याने बुलीवरच खाद्यपदार्थ बनवले जात असून, ग्राहकही आवडीने या चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत. आखाती देशांत भडकलेल्या युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झाली आहे.

याचा परिणाम म्हणून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहरातील हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना गॅस सिलिंडर मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शहरातील सुमारे दोनशे हॉटेल रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. दरम्यान, या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी हॉटेल चालकांनी चुलीचा पर्याय स्वीकारला आहे. बाबा पेट्रोल पंप परिसरातील एका हॉटेल चालकाने गॅस मिळत नसल्याने चूल पेटवली आहे. तिथे चुलीवरच विविध खाद्यपदार्थ बनवून ग्राहकांना दिले जात आहेत. विशेष म्हणजे, चुलीवरच्या जेवणाला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news