Education in Zilla Parishad schools in Mahur taluka is in disarray
श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा :
जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत १३२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, शिक्षकांची तिथे ५ पदे मान्य असून आजमितीस केवळ दोनच शिक्षक कार्यरत असल्याने विद्याथ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. रिक्त जागा तातडीने न भरल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा ईशारा पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
माहूर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या शाळेत प्राथमिक शिक्षकांची तब्बल १०८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून येते. परंतु तात्पुरती नियुक्ती मिळालेले पर्यायी शिक्षकाची व्यवस्था करण्यात शिक्षक त्या शाळेत जातीलच, याची ठामपणे कुणालाच खात्री देता येत नाही.
त्यामुळे तालुक्यातील शाळेतील विशेषतः दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची मोठी शैक्षणिक दैना होत आहे. ही बाव लक्षात घेऊन शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालक गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या सारखा खेटा घालत आहेत. रिक्त जागा संदर्भात प्रभारी गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांचेशी संपर्क केला असता ते तारखेवर तारखा देत आहेत..
गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर रंजित पवार, युवराज जाभय, शरद जाधव, पंडित पवार, सय्यद नूर, प्रवीण केचे, दिनेश वायकुळे, राम खाडे अशा ३५ पालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
एका शिक्षकावरच शाळेचा भार
तांदळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असून १३२ विद्याधर्थी शिक्षण घेत आहेत, तिथे कार्यरत दोन शिक्षकापैकी एक शिक्षक कार्यालयीन कामानिमित्त रोजच शाळेबाहेर असल्याने शाळेचा भार केवळ एकाच शिक्षकाला उचलावा लागत असल्याची व्यथा पालकांनी आपल्या तकारीत मांडली आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा बोजवारा उडूनही शासनाचा शिक्षण विभाग मात्र तोंडावर बोट ठेऊन गप्प आहे, याचा संताप पालकांमधून होत आहे.
दुर्गम भागातील विद्यार्थी वाऱ्यावर
रिक्त जागा भरण्यासंदर्भात दै. पुढारीच्या प्रतिनिधीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बंदना फुटाणे यांना संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कुणीच बाली नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.