नांदेडच्या वाजेगाव परिसरात पहाटे गोळीबार; सराईत गुन्हेगार जखमी File Photo
नांदेड

Nanded Crime : नांदेडच्या वाजेगाव परिसरात पहाटे गोळीबार; सराईत गुन्हेगार जखमी

हल्ला की बनाव? हाताला गोळी लागल्याने संशय वाढला

पुढारी वृत्तसेवा

नांदेड :दीड महिन्यापूर्वी नगीना घाट परिसरात झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच, बुधवारी (दि. ११) पहाटे नांदेड शहर पुन्हा गोळीबाराच्या आवाजाने हादरले आहे. वाजेगाव भागात एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार झाला असून, यात तो जखमी झाला आहे. मात्र, जखमी आणि आरोपी दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने आणि गोळी हाताला लागल्याने, हा हल्ला आहे की स्वतःच रचलेला बनाव ? या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास वाजेगाव परिसरातील छोट्या पुलाजवळ ही घटना घडली. अरबाज खान याच्यावर गोळी झाडण्यात आली. या हल्ल्यात त्याच्या हाताला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी अरबाज खान याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आवेज खान याने जीवे मारण्याच्या उद्देशाने आपल्यावर गोळीबार केला. विशेष म्हणजे, फिर्यादी अरबाज खानवर यापूर्वी बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी (आर्म अॅक्ट) दोन आणि इतर दोन असे एकूण चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर संशयित आरोपी आवेज खानवरही दोन गंभीर गुन्हे नोंद आहेत. गुन्हेगारी वर्चस्वातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

  • घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिसांची पथके आरोपीच्या शोधात रवाना केली आहेत. अरबाज खान याच्या तक्रारीवरून ग्रामीण ठाण्यात आवेज खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT