Chatrapati Sambhajinagar Crime : निवडणुकीच्या वादातून दोन गटांत हाणामारी

गंगापूर पोलिस ठाणे आवारातील घटना, परस्परविरोधी तक्रार
Chatrapati Sambhajinagar Crime
निवडणुकीच्या वादातून दोन गटांत हाणामारीFile Photo
Published on
Updated on

गंगापूर : निवडणुकीच्या वादातून गंगापूर शहरात थेट पोलिस ठाण्याच्या आवारातच दोन गटांत फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.८) सायंकाळी घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध परस्परविरोधी फिर्यादी दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशवाडी येथील विशाल अशोक निरपळ (२५) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ते व त्यांचा मित्र गणेश निरपळ गंगापूर शहरात आले असता पोलिस ठाण्याच्या गेटजवळ निवडणुकीच्या कारणावरून काही जण त्यांच्या काका दिलीप निरपळ व सहकाऱ्यांशी वाद घालत होते.

Chatrapati Sambhajinagar Crime
Paithan water supply scheme : मुख्य जलवाहिनीवर ठराविक ठिकाणीच हायड्रोलिक चाचणी

हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असताना रामेश्वर मुंदडा सुमित मुंदडा, सचिन मुंदडा, अमित मुंदडा, महेश मुंदडा, प्रशांत सुंब, राहुल सटाले, बिरजु भरपुरे, किरण साळवे व इतरांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी सुमित मुंदडा याने अज्ञात वस्तूने डोक्यावर मारून जखमी केल्याचे तसेच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर परिणाम दाखवू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, जाधव गल्ली येथील रामेश्वर कन्हैयालाल मुंदडा (६८) यांनी दिलेल्या फिर्यादीत वेगळी भूमिका मांडली आहे. राहुल सटाले यांचा फोन आल्याने ते पोलिस ठाण्यात आले असता दिलीप निरपळ, बाळू शिंदे, विशाल निरपळ, संदेश निरपळ, संतोष पाचपुते व इतरांनी त्यांच्यावर व त्यांच्या मुलांवर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दिलीप निरपळ यांनी सुमितला जिवे मारण्याची व कुटुंबाला संपवण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, पोलिस ठाण्याच्या आवारातच दोन गटांत मारामारी झाल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

Chatrapati Sambhajinagar Crime
Parbhani News : भाजपाची शतप्रतिशतच्या दिशेने वाटचाल

पोलिसांचा हस्तक्षेप

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही गटांना बाजूला करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news