Jayakwadi Dam जायकवाडीच्या भूमिपूजनाचे हिरक महोत्सवी वर्ष ! File Photo
नांदेड

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या भूमिपूजनाचे हिरक महोत्सवी वर्ष !

आधुनिक मराठवाड्याचे शिल्पकार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव भाऊराव चव्हाण यांच्या यंदाच्या १०६व्या जयंती वर्षातच त्यांनी मोठ्या राजकीय संघर्षातून; पण नेटाने साकारलेल्या जायकवाडी धरणाच्या भूमिपुजनाच्या हीरकमहोत्सवी वर्षाचा योग जुळून येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Diamond Jubilee Year of Jayakwadi's Bhoomi Pujan!

संजीव कुळकर्णी

नांदेड : आधुनिक मराठवाड्याचे शिल्पकार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव भाऊराव चव्हाण यांच्या यंदाच्या १०६व्या जयंती वर्षातच त्यांनी मोठ्या राजकीय संघर्षातून; पण नेटाने साकारलेल्या जायकवाडी धरणाच्या भूमिपुजनाच्या हीरकमहोत्सवी वर्षाचा योग जुळून येत आहे.

मराठवाडयातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील एक मोठे धरण अशी 'जायकवाडी'ची ओळख असून छ. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण गाव्राजवळच्या या धरणाचे भूमिपुजन तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शाखी यांच्या हस्ते तसेच तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत १८ ऑक्टोबर १९६५ रोजी झाले होते. शंकरराव तेष्ठा राज्याचे पाठबंधारे होते आणि याच दशकात त्यांनी राज्यातल्या वेगवेगळ्या भागातील पाटबंधारे प्रकल्पांना गती दिली होती.

जायकवाडी धरणाच्या भूमिपुजनाची तारीख, त्याआधीच्या सर्व घडामोडी, त्या काळातील संघर्ष, नगर जिल्ह्यांतून या धरणाला झालेला विरोध इत्यादी सर्व बाजींचा तपशील मागील काही वर्षांत वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये शब्दबद्ध झालेला आहे. शंकररावांचा कणखरपणा, त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि तेव्हा अतिमागास असलेल्या मराठवाडा विभागाचे हित जपण्याचे त्यांचे धोरण हे सारे जायकवाडी धरणाच्या निर्मितीच्या निमित्ताने ठळक झाले. तत्कालीन केंद्रीय मंत्री डॉ. राव यांना जायकवाडीची तांत्रिक बाजू पटवून देत त्यांची मंजुरी मिळविण्यात शंकरराव यशस्वी झाले होते.

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक डॉ. सुरेश सावंत, राज्यातील पाणीप्रश्र आणि त्यावरून झालेल्या राजकारणाचे अभ्यासक डॉ. सुधीर भोगळे यांच्या तसेच त्या काळातील काही अभियंत्यांच्या पुस्तकांमध्ये जायकवाडी कहाणी सांगण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी हे धरण माजलगाव तालुक्यात 'जायकुचीवाडी' येथे प्रस्तावित होते. पण राज्य स्थापनेनंतर या भरणासाठी पैठणची निवड करण्यात आली. १९५६ से १९६५ या कालखंडात या धरणासंबंधाने बयाच घडामोडी झाल्या, त्याचा तपशील खूप विस्तृत आहे.

पाटबंधारे खात्यातील माजी मुख्य अभियंता गो.बि. अभंगे यांच्या नोंदीनुसार, गोदाबरी नदीवरील या मोठ्या प्रकल्पाची संकल्पना (कै.) रामचंद्रराव कसलेकर यांची होती. नंतरच्या काळात नारायणराव चेरेकर यांनी वरील प्रकल्पास मूर्त स्वरूप दिले. या धरणाच्या प्रशासकीय मान्यतेपासून तांत्रिक मंजुरीपर्यंतच्या प्रवासात चेरेकर यांचा सहभाग होता. खुद्द शंकररावांनी खूप नंतरच्या एका मुलाखतीत चेरेकर यांच्या योगदानाचा 'भरणासाठी जागा तपासण्याच्या कामातील निष्णात माणूस' अशा शब्दांत गौरव केला होता.

लालबहादूर शाणी यांनी १९६५ साली धरणाचे भूमिपुजन केल्यानंतर १९७५ साली या धरणामध्ये जलपूजन करण्यात आले. या सबंध दशकात या धरणावरून विधिमंडळाच्या सभागृहात आणि बाहेरही आरोप-प्रत्यारोप झाले. तो सबंध फाळ शंकररावांसाठी कसोटीचा, ताणतणावाचा होता. आरोप आणि आक्षेपांना त्यांनी वेळोवेळी उत्तरे दिली. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात त्यांच्यावर आर्थिक पोटाळा किंवा भ्रष्टाचाराचा आरोप विरोधकांनाही करता आला नाही. याच काळात त्यांना जीवे मारण्याचा एक प्रयत्नही झाला होता; पण त्यातून वे बचावले. या धरणाचे उद्‌घाटन शास्त्री यांच्यानंतरच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले तेव्हा शंकरराव राज्याचे मुख्यमंत्री होते.

धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील काळात कालवे, शाखा कालवे आणि वितरिकांचे जाळे लाभक्षेत्रात पसरले. पुढच्या टप्प्यात माजलगाव येथे चरण शाले, कोट्यवधी रूपये खर्पून बांधण्यात आलेल्या या धरणाच्या लाभहानीची भार्चा गेल्या २५ वर्षापासून सुरूच असून तो एका स्वतंत्र अभ्यासाचा विषय असला, तरी औरंगाबाद-जालना परिसरातील गिण्याच्या पाण्याचा पुरवता आणि औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारासाठी या धरणाचा मोठा लाभ झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT