दिल्ली, पंजाबमधील आरोपीला नांदेडमध्ये अटक  pudhari photo
नांदेड

Nanded Crime News : दिल्ली, पंजाबमधील आरोपीला नांदेडमध्ये अटक

खून, फायरिंगच्या सहा गुन्ह्यांत हवा होता आरोपी

पुढारी वृत्तसेवा

नांदेड ः पंजाब व दिल्ली येथे खुन, फायरींग, धमकी असे गुन्हे करुन नांदेड मध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सेंट्रल एजेन्सीचे अधिकारी व दिल्ली येथील स्पेशल सेलची टिम नांदेडमध्ये आली. या टिमने नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमच्या मदतीने या गुन्हेगारास नांदेडच्या बांदाघाट परिसरातून अटक केली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, पंजाब राज्यातील जि. होशीयारपूर येथील अर्शदिपसिंग जविंदरसिंग वय 27 हा अट्टल गुन्हेगार पंजाब व दिल्ली येथे दोन खुनाचे गुन्हे, फायरींग व धमकी अशा सहा गुन्हयात दिल्ली व पंजााब पोलीसांना हवा होता. तो अनेक दिवसांपासून पोलीसांना हातावर तुरी देऊन पसार होत होता.

अर्शदिपसिंग आता नांदेड मध्ये असल्याची खात्रीलायक माहिती सेंट्रेल ऐजन्सीची टिम व दिल्लीची स्पेशल सेलच्या टिमला मिळाली या दोन्ही टिम नांदेडमध्ये आल्या. त्यांनी नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या पथकाची मदत घेऊन अर्शदिपसिंगला बांदाघाट परिसरातून अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT