Crop damage due to nilgai
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवाः भोकरन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात निल गाईंसह हरिणांच्या कळपांचा सुळसुळाट झाल्याने खरीप हंगामात पेरलेल्या कोवळ्या पिकांचे नुकसान होत आहे. वन विभागाने कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांतुन होत आहे.
पिंपळगाव रेणुका परिसरात अनेकांनी मका, सोयाबीन, उडीद, तुर, कपाशी आदी पिकांची लागवड केली असून काही शेतकरी ती करीत आहेत. मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे. रिमझिम पावसामुळे पेरणी व लागवडीला वेग आला आहे. उगवून येणाऱ्या कोवळ्या पिकाचे हरिणांसह निलगायींमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
पिंपळगाव रेणुकाई परिसरात शंभर ते सव्वाशे निलगायींचा वावर आहे. यामुळे शेतामध्ये लागवड केलेल्या माल पूर्णपणे खराब होत आहे. वनविभागाने तत्काळ निलगायींचा बंदोबस्त करावे- कृष्णा बेराड, शेतकरी